“पक्ष सोडून भाजपबरोबर गेले तरी उपमुख्यमंत्री केलं आता…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त सभा आयोजित करण्यात आलेली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत मनातली खदखद बोलून दाखवली.

“मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही. हा कोणता न्याय?”, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण प्रतिक्रिया दिली आहे.

“तुमच्याइतकी संधी कुणालाच मिळाली नाही”

“अजित पवारांना (Ajit Pawar) आणखी काय संधी मिळायला पाहिजे होती. त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कोणालाही मिळाली नाही. त्यांनी अनेक वेळा राजीनामा दिला. पक्ष सोडून भाजपबरोबर शपथ घेतली. तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद दिलं. त्यांना आणखी काय व्हायचंय? पंतप्रधान व्हायचं असेल तर ते आता शरद पवार करू शकत नाहीत”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावललं गेलं. आम्ही दिवसरात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला. मीच आता 60 वर्षांच्या पुढे गेलो, आता किती दिवस थांबायचं? आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही?”,असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला होता. यावरच पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत टीका केली.

यावेळी चव्हाण यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या किती जागा निवडून येणार, याबबतही भाष्य केलं. “माझाही अंदाज असाच आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या 30 पेक्षा जास्त कदाचित 35 पर्यंत जागा येण्याची शक्यता आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

तसंच “महाविकास आघाडीचं बहुमत असणार आहे. भाजपचा दारुण पराभव होणार आहे. 5 ते 7 राज्यात भाजपच्या जागा कमी होतील”, असा मोठा दावा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांचा दावा आता कितपत खरा ठरणार, ते पाहावं लागेल.

News Title – Prithviraj Chavan criticized Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्समधील भांडण अखेर समोर, खेळाडूंनी केली पांड्याची तक्रार

“15 सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणारही नाही”; नवनीत राणांचं ओवैसींना थेट आव्हान

“4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार”

मिनी फोल्डिंग ई-बाईक, किंमत फक्त… किंमत ऐकून चकीत व्हाल

“शरद पवारांचा मुलगा नसल्याने मला..”; अजित पवारांच्या मनातली सल अखेर उघड