महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! यामागचं नेमकं कारण काय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahanand Dairy l सर्वात महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजेच अर्थात महानंद डेअरी आता इतिहास जमा झाली आहे. महानंद डेअरीचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे सोपवण्यात आला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची संपुन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे.

राज्य सरकार महानंदला 253 कोटी रुपयांची मदत करणार :

महानंदवर मदर डेअरीनं ताबा मिळवला आहे. मदर डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळातर्फे चालवली जात असते. महानंदची आर्थिक स्थिती ही फारच बिकट झाल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता. मात्र महानंद डेअरीला राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखले जाते.

या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा मात्र काहीदिवसांपासून चर्चेत होता. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्यावरुन एकमेकांवर आरोप देखील केले होते. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि महानंद यांच्यावतीनं पुनरुज्जीवनासाठी 253.57 कोटी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकार या प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून 253 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहेत

Mahanand Dairy l महानंदवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप :

महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई या संस्थेची स्थापना 9 जून 1967 स्थापना रोजी झाली आली होती. राज्यातील दूधसंघांची शिखर संस्था म्हणून या दूध संघाची राज्यभर ओळख होती. महानंद ही संस्था 2004 पर्यंत अतिशय फायद्यात होती. मात्र यानंतर राज्यातील दूध संघांनी स्वत:च्या नावाच्या ब्रँडनं दूध विक्री सुरु केली. यानंतर महानंदला उतरती कळा लागली असल्याचं बोललं जात आहे.

महानंदच्या हस्तांतरण प्रक्रियेवरुन राज्यात चांगलंच राजकारण रंगलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठे आरोप केले आहे. महानंदच्या अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळं ही परिस्थिती ओढवल्याचं म्हटलं जात होतं. मात्र राजेश परजणे यांनी संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

News Title – Mahanand Dairy Handovered NDDB 

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार?; माजी क्रिकेटपटूचं भाकीत

हिरामंडी सिरिजमध्ये ‘या’ अभिनेत्रीने घेतलं सर्वाधिक मानधन

“पक्ष सोडून भाजपबरोबर गेले तरी उपमुख्यमंत्री केलं आता…”

“…त्याला मी ठार केलं”, ब्रिजभूषण सिंह यांच्या कबुलीने देशभरात खळबळ