विखे- लंकेंसाठी हे 7 राजकारणी नगरमध्ये धुरळा करणार; विखेंसाठी 4 तर लंकेसाठी 3 सभा होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ahmednagar Loksabha l लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे ला पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारणकडे प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. यापार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु झाला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल सात सभा होणार आहेत. या सभेला राज्यातील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित पाहणार आहेत.

आज अहमदनगरमध्ये दिग्गज नेतेमंडळींच्या सभा होणार :

आज अहमदनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भूषणसिंह होळकर, भास्कर जाधव यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जाणार आहे.

नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोहित पवार यांच्या मतदारसंघात येणार आहेत. त्यामुळे ते रोहित पवार यांच्याबाबत काय बोलणार याकडे सर्व राज्यच लक्ष लागल आहे. त्यानंतर कर्जत येथील सभेनंतर अजित पवार यांची महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघात दुपारी एक वाजता सभा घेणार आहे. आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांसोबत गेल्यामुळे आज त्यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.

Ahmednagar Loksabha l आज अहमदनगरमध्ये कोणत्या भागात सभा होणार?

भाजप उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ एकूण चार सभा होणार

अजित पवार – सकळी 9:30 वाजता कर्जत बाजार तळ येथे सभा होणार.

अजित पवार – सकाळी 11 वाजताची पारनेरचा बाजार तळ येथे सभा होणार.

पंकजा मुंडे- दुपारी 1 वाजता पाथर्डी बाजार तळ येथे सभा होणार.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले – सायंकाळी 6 वाजता नगर शहरातील मंगल गेट येथे सभा होणार.

निलेश लंके यांच्या प्रचारार्थ एकूण तीन सभा होणार :

जयंत पाटील- सकाळी 9 वाजता शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव फाटा येथे सभा घेणार.

जयंत पाटील, भास्कर जाधव, भुषणसिंह होळकर – सायंकाळी 6:30 वाजता जामखेड येथे सभा घेणार.

सुप्रिया सुळे- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे.

News Title – Ahmednagar LokSabha Today News

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! यामागचं नेमकं कारण काय

या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार?; माजी क्रिकेटपटूचं भाकीत

हिरामंडी सिरिजमध्ये ‘या’ अभिनेत्रीने घेतलं सर्वाधिक मानधन

“पक्ष सोडून भाजपबरोबर गेले तरी उपमुख्यमंत्री केलं आता…”