नाशिकमध्ये ट्विस्ट; बड्या नेत्याच्या आरोपाने मोठा राजकीय भूकंप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal |  नाशिकच्या जागेवरून मोठा संभ्रम गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मागणी केली. मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे भुजबळ नाराज आहेत. अशात भुजबळ यांच्यावर शिवसेनेच्या एका नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे. विरोधकांचा प्रचार करत आहेत. ते तुतारीचा प्रचार करत असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्याने केला आहे.

भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा धक्कादायक दावा शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. आमच्याकडे व्हिडीओ आणि फोटो असल्याचं कांदे म्हणाले आहेत. भुजबळांनी हे आरोप फेटाळले आहेत. भुजबळांनी कांदे यांनी केलेल्या आरोपावर प्रत्यारोप केला ते म्हणाले की, भुजबळांवर टीका केली की मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते.

“दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे”

सुहास कांदे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. भुजबळ यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं सुहास कांदे म्हणाले. नांदगाव मतदारसंघातून भारती पवार यांना मतं मिळाली तर त्याचे श्रेय हे मला आणि शिवसेनेला जाईल, असं सुहास कांदे म्हणाले आहेत. ते श्रेय आम्हाला मिळू नये यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तुतारीचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ आले आहेत.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महायुतीचा धर्म न पाळता विरोधी पक्ष असलेल्या तुतारी चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत. मंत्रीपदं आपली महायुतीकडून घ्यायची आणि प्रचार आणि प्रसार हा विरोधकांकडून करायचा. महायुतीचा धर्म न पाळता भुजबळ यांनी आपला राजीनामा देऊन खुशाल तुतारी वाजवावी, असं आव्हान सुहास कांदे यांनी दिलं आहे.

छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रचार करत असल्याचं दिसून आलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला.

आरोप फेटाळले

यावर छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. आधीच कांद्याच्या प्रश्नावर लोकं प्रक्षुब्ध असताना दोन दोन कांद्यांचा त्रास भारती पवार यांना नको असं असं भुजबळ म्हणाले. तसेच कांदे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

News Title – Chhagan Bhujbal Campaign For Tutari NCP Sharad chandra Pawar Party

महत्त्वाच्या बातम्या

“15 सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणारही नाही”; नवनीत राणांचं ओवैसींना थेट आव्हान

“4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार”

मिनी फोल्डिंग ई-बाईक, किंमत फक्त… किंमत ऐकून चकीत व्हाल

“शरद पवारांचा मुलगा नसल्याने मला..”; अजित पवारांच्या मनातली सल अखेर उघड

“एकनाथ शिंदे कोण आहेस तू?”; प्रियंका चतुर्वेदी भरसभेत भडकल्या