उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाणार असाल तर ‘या’ चुकांपासून दूर राहा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Water Park Tips l सध्या उन्हाचा कडाका शिगेला पोहोचला आहे, त्यामुळे लोक या कडक उन्हापासून आराम मिळण्यासाठी वॉटर पार्कला जातात. त्यामुळे उन्हापासून थोडासा दिलासा मिळतो. मात्र तुम्ही वॉटरपार्क जात असाल तर तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर आज आपण वॉटर पार्कला जाताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात…

वॉटर पार्कवर या गोष्टींची काळजी घ्या :

तुम्ही कुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसोबत वॉटर पार्कमध्ये मजा करण्यासाठी नक्कीच जाल, पण यादरम्यान तुमच्या आहाराचीही विशेष काळजी घ्या. काहीही न खाता घराबाहेर पडण्याची चूक करू नका. यासह वॉटर पार्कमध्ये प्रत्येक थोड्या वेळाने काहीतरी खाणे आणि पिणे चालू ठेवा. या ऋतूमध्ये हायड्रेटेड राहणे देखील महत्त्वाचे आहे, यासाठी तुम्ही वेळोवेळी पाणी किंवा कोणतेही एनर्जी ड्रिंक पिऊ शकता.

जर तुम्ही वॉटर पार्क्समध्ये एन्जॉय करण्यासाठी जात असाल तर तुम्ही थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असता. अशावेळी तुमची स्किनला टॅनिंग किंवा सनबर्नची समस्या होऊ शकते. त्यामुळे वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

Water Park Tips l वॉटर पार्कमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्या :

मौजमजा करताना टॉवेल, कपडे यांसारखी इतर कोणाचीही वस्तू वापरणार नाही याची विशेष काळजी घ्या. दुसऱ्याच्या वस्तू वापरल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच वॉटर पार्कमध्ये मुल खूप मजा करतात, परंतु या काळात तुम्हाला त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना सोबत ठेवा आणि वेळोवेळी त्यांना काही ना काही खायला द्या.

वॉटर पार्कमध्ये अशा अनेक हाय राईड्स आहेत ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते, यासोबतच जर तुम्ही पोटभर जेवून गेलात तर तुम्हाला राइड्स दरम्यान उलट्या देखील होऊ शकतात. अशावेळी पोटभर जेवून घराबाहेर पडण्याऐवजी काहीतरी हलके खाऊन वॉटर पार्कमध्ये जाणे गरजेचे आहे.

News Title – Avoid these mistakes while going to water park

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे गौप्यस्फोट, “माझ्यापुढे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते”

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं वक्तव्य

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही

विखे- लंकेंसाठी हे 7 राजकारणी नगरमध्ये धुरळा करणार; विखेंसाठी 4 तर लंकेसाठी 3 सभा होणार

महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! यामागचं नेमकं कारण काय