नरेंद्र दाभोलकर खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दिला सर्वात मोठा निकाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Dabholkar | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.

11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल

कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत. यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही. दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकीस संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

दोन आरोपी दोषी

विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुकत्ता करण्यात आली आहे.विरेंद्र तावडे यांच्या कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. वकील संजीव पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा आरोपींना सल्ला दिला होता तसच विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्ततता करण्यात आली आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

जो निकाल आला आहे त्या निकालाचा आदर करतो, पण उर्वरीत आरोपींना निर्दोष सुनावण्यात आल्याने, आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊ, असं दाभोलकरांच्या वकिलांनी सांगितलं.

Narendra Dabholkar प्रकरण काय?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला.

News Title-The court gave the biggest verdict in Narendra Dabholkar murder case

महत्त्वाच्या बातम्या-

शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे गौप्यस्फोट, “माझ्यापुढे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते”

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं वक्तव्य

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही

विखे- लंकेंसाठी हे 7 राजकारणी नगरमध्ये धुरळा करणार; विखेंसाठी 4 तर लंकेसाठी 3 सभा होणार

महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! यामागचं नेमकं कारण काय