गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती

Gold-Silver Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. हा दिवस हिंदु धर्मानुसार शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही कामाची सुरवात चांगल्या प्रकारे होते असंही म्हणतात. आज या शुभ मुहूर्ताला ग्राहकांना मोठी आनंदवार्ता मिळाली आहे.

आज 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झाली आहे.त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी मुंबईत आता 73000 रुपये मोजावे लागत आहे.

सोन्याचे दर घसरले

या आठवड्याच्या सुरुवातीला 7 मे रोजी सोने 330 रुपयांनी वाढले. 8 मे रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. तर 9 मे रोजी त्यात तितकीच घसरण झाली. तर, आज अक्षय्य तृतीयाला सोनं पुन्हा उतरलं.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोनं 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दर कमी झाले असले तरी सध्या सोनं हे 70000 रुपयांच्या पुढेच आहे.

चांदीचे भाव वधारले

आज चांदीचे भाव मात्र वाढले आहेत. 6 आणि 7 मे रोजी चांदीच्या किंमतीत 1 हजारांची वाढ झाली होती.8 मे रोजी किंमती स्थिर होत्या. 9 मे रोजी त्यात पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,200 रुपये आहे.

कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 72,320 रुपये, 23 कॅरेट 71,216 रुपये, 22 कॅरेट सोने 65,496 रुपये झाले. 18 कॅरेट 53,627 रुपये, 14 कॅरेट सोने 41,829 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today 10 May 2024

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र दाभोलकर खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दिला सर्वात मोठा निकाल!

उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाणार असाल तर ‘या’ चुकांपासून दूर राहा

शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे गौप्यस्फोट, “माझ्यापुढे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते”

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं वक्तव्य

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही