PNB Alert l आजकाल नागरिक बँकेत पैसे ठेवण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण बँकेत पैसे सुरक्षित राहतात. मात्र आता पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खात असणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक रेड अलर्ट जारी केला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, काही ग्राहकांची बँक खाती बंद केली जाणार आहेत. त्यामुळे बँक खातेधारकांचं टेन्शन वाढलं आहे.
पंजाब नॅशनल बँकेने घेतला मोठा निर्णय :
पंजाब नॅशनल बँकेने काही खाते बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षात कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नसलेले आणि ज्या नागरिकांच्या खात्यात शून्य रक्कम असेल अशा सर्व नागरिकांची बँक खाती एका महिन्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांच्या खात्यावरुन कोणत्याही प्रकारचे व्यवहार होत नाहीत फक्त तेच खाते बंद केली जाणार आहेत. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांची पंजाब नॅशनल बँकेत खाती आहेत त्यांनी बँकेत जाऊन यासंदर्भातली माहिती जाणून घ्यावी.
पंजाब बँकेने या बंद खात्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये म्हणून निर्णय घेतला आहे. राज्यात अनेक घोटाळा करणारे लोक व्यवहार होत नसलेल्या खात्यांचा गैरवापर करताना सध्या आढळत आहेत. त्यामुळे बँकेनं कोणत्याही प्रकारचा खात्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून अकाउंट बंद करण्याचा थेट निर्णय घेतला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाणार आहे.
PNB Alert l डिमॅट खाते बंद होणार का? :
पंजाब नॅशनल बँकेने बंद पडलेली खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बँक डिमॅट खाती बंद करणार नाही. हे सर्व नियम डिमॅट खात्यांसाठी लागू होणार नाही. याशिवाय ज्या नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांसाठी खाते उघडले आहेत ते खाते बंद केली जाणार नाहीत.
याशिवाय अल्पवयीनांचे बचत खातेही देखील बंद होणार नसल्याची माहिती बँकेने दिली आहे. दरम्य़ान, एखाद्या ग्राहकाचे व्यवहार न झालेले खाते जर बंद केले आणि ते खाते पुन्हा सुरु करायचे असेल तर त्या ग्राहकाला शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच केवायसी फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत.
News Title – Punjab National Bank Non Performing Account Closed
महत्त्वाच्या बातम्या
“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं
गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती
प्रियंका चतुर्वेदींनी भरसभेत केली मोदींची नक्कल, म्हणाल्या…
शेतकऱ्यांनो अशाप्रकारे चेक करा PM किसान योजनेच्या 17 वा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही?
नरेंद्र दाभोलकर खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दिला सर्वात मोठा निकाल!