‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather | महाराष्ट्रात वातावरणामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस, असं हवामान सध्या सगळीकडे आढळून येतंय. या बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या देखील अनेक समस्या समोर येत आहेत. अशात काही भागांना पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज (10 मे) वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. उकाडा वाढल्याने रात्रीही दमटपणा वाढला आहे.

मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वातावरणात बदल दिसतील.

विदर्भामध्ये वाशीम, गोंदिया येथे वादळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. दुसरीकडे मालेगावमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पलिकडे पोहोचले. त्यामुळे कुठे पाऊस तर कुठे ऊन असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालंय.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा दिला असून भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक तापमान वाशिम आणि मालेगावमध्ये नोंदवण्यात आलंय. त्या खालोखाल पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक आणि निफाड यांचा क्रमांक लागतो. या सर्व ठिकाणी तापमान 40 च्या आसपास नोंदवलं गेलंय.

News Title : Maharashtra Weather in May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद

सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना थेट ऑफर

“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं

गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती

प्रियंका चतुर्वेदींनी भरसभेत केली मोदींची नक्कल, म्हणाल्या…