शिरुरमध्ये अजित पवारांचा सभांवर सभांचा तडाखा, शिवाजी आढळराव पाटलांना पराभवाची भीती?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur Loksabha | बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर अजित पवार यांनी शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघाकडे आपलं सगळं लक्ष वळवलं असल्याचं दिसत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी आपल्या सभांचा नुसता तडाखा लावला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. गावागावात कट्ट्याकट्ट्यावर अजित पवार यांच्या वाढलेल्या सभांच्या चर्चा सुरु आहेत.

अजित पवार यांच्या सभांवर सभा-

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती, त्यामुळे त्या मतदारसंघातील मतदान होईपर्यंत अजित पवार यांनी इतर मतदारसंघांमध्ये फारसं लक्ष दिलं नव्हतं. मात्र जसं बारामतीचं मतदान संपलं तसं अजित पवार यांनी आपले उमेदवार असलेल्या मतदारसंघांकडे लक्ष केंद्रीत केलं. त्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघाची जागा आता चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

शिरुरमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यापुढे राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांचे आव्हान आहे. शिवाजी आढळराव पाटील हे मूळचे शिवसेनेचे नेते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र शिरुरची जागा अजित पवार यांना गेल्याने त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांनाही इथं तेवढा ताकदीचा उमेदवार सापडला नाही, त्यामुळे त्यांनी देखील आपल्या विरोधात कायम भूमिका घेतलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांना पक्षप्रवेश दिला आणि लोकसभेचं तिकीट सुद्धा दिलं.

आता हीच शिरुर लोकसभेची (Shirur Loksabha) जागा अजित पवार यांनी प्रतिष्ठेची बनवल्याचं दिसत आहे. बारामतीचा प्रचार संपताच अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात सभांचा तडाखा लावला आहे. साधारणपणे प्रत्येक जिल्हा परिषद गटात अजित पवार यांची सभा होताना दिसत आहे. एकाच दिवसात अजित पवार चार-चार पाच-पाच सभा घेताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या सभांचा तडाखा या मतदारसंघातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

शिरुरमध्ये अजित पवारांच्या एवढ्या सभा का?

अजित पवार यांना महायुतीमध्ये तशा कमीच जागा मिळाल्या आहेत, त्यातही काही वाहिन्यांनी दाखवलेल्या ओपिनियन पोलमध्ये अजित पवार गटाला शून्य लोकसभेच्या जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. बारामतीचं मतदान संपल्यानंतर त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या जागांवर अधिक लक्ष दिल्याचं पहायला मिळत आहे.

शिरुरमध्ये आढळराव पाटील जरी आयात केलेले उमेदवार असतील तरी ते या मतदारसंघातील माजी खासदार आहेत. त्यांची या मतदारसंघात (Shirur Loksabha) स्वतःची वोट बँक आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार जरी अजित पवार यांच्यासोबत असले तरी या आमदारांचं आढळराव पाटील यांच्याशी कायमच वैर राहिलेलं आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या बाजूने भावनिकतेची लाट आहे, त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार गटाला निवडणूक जड जाताना दिसत आहे. शिरुरमध्ये पराभवाच्या भीतीने अजित पवार यांनी सभांचा तडाखा लावला आहे का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

News Title: Shirur Loksabha Ajit Pawar Rally Increased for Shivaji Adhalrao Patil

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद

सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना थेट ऑफर

“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं

गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती