दहावी-बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर!

Maharashtra SSC Result

SSC-HSC Result Date 2024 | फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार, याची प्रतिक्षा लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केले जातात.

आता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. परीक्षांच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात असून बोर्डाकडून लवकरच तारीख जाहीर होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याबबात महाराष्ट्र बोर्डाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच निकाल जाहीर होईल असं म्हटलं जातंय. निकाल जाहीर झाल्यानंतर परिक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईटवर निकाल बघू शकतात.

येथे पाहा निकाल

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत (SSC-HSC Result Date 2024) वेबसाइट mahresult.nic.in/mahahsscboard.in वर भेट द्यावी. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे.

यानंतर हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल. निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.तुम्हाला भविष्यात ती कमी येईल.

परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाली. तर, इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च या कालावधीत पार पडली. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर, दहावीच्या परीक्षेत जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले होते. आता विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत.

News Title- SSC-HSC Result Date 2024  

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .