नेत्यांवर दबाव टाकून बळजबरीनं केलं जातंय पक्षांतर?; वायकरांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपविरोधात रोष वाढला

Rage against BJP after Ravindra Waikar revelations

BJP | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यात एक मोठा गोप्यस्फोट करण्यात आलाय. राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. ईडीच्या कारवाईनंतर जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते, असं म्हणत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.

रवींद्र वायकर यांच्या खुलाश्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. निवडणुकीच्या काळात हे खुलासे समोर आल्याने महायुतीच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो. वायकरांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपविरोधात रोष वाढण्याची दाट चिन्हे आहेत.

भाजपच्या दबावतंत्रापुढे नेत्यांनी गुडघे टेकले?

महाविकास आघाडीकडून अगोदरपासूनच भाजपवर आरोप करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा देखील ’50 खोके एकदम ओके’ अशी घोषणा देण्यात आली. आमदारांना बंड करण्यासाठी कोटींची रक्कम देण्यात आली असं तेव्हा म्हटलं गेलं. अशात शिंदे गटाच्याच नेत्याने आतली गोष्ट बाहेर काढल्याने राज्यात सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

शिवसेना फुटली तेव्हा शिंदे गटात गेलेले आनंदराव अडसूळ, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव, भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून तपास करण्यात येत होता. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आल्या होत्या. काँग्रेसमधील देखील अनेक (BJP ) दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला तेव्हा राहुल गांधी यांनी देखील त्यांच्यावर दबाव असल्याचं म्हटलं होतं.

वायकरांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपविरोधात रोष

अशात शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व राज बाहेर काढले आहेत.”माझ्यासमोर केवळ दोनच पर्याय होते. एक म्हणजे गजाआड जाणं आणि दुसरं म्हणजे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं. दबाव तर होताच. मात्र पत्नीचेही नाव गोवण्यात आलं. त्यामुळे माझ्यावर तसा दुसरा पर्याय नव्हता. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली ती कोणावरही आणू नये.”, असं वायकर म्हणाले आहेत.

गेली 50 वर्षे मी बाळासाहेबांसोबत होतो, उद्धव ठाकरेंसोबत होतो. मात्र जेव्हा त्यांना सोडलं तेव्हा कुटुंबातील सदस्याला आपण सोडत आहे असं वाटत असल्याचं रायकर यांनी मुलाखतीत बोलत असताना सांगितलं आहे. त्यांच्या या खुलाश्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.यामुळे भाजपाविरोधात (BJP ) आणि महायुतीविरोधात रोष वाढु शकतो. निवडणुकीवर देखील याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

News Title –  Rage against BJP after Ravindra Waikar revelations

महत्त्वाच्या बातम्या-

‘ही शेवटची संधी आहे तुम्हाला’; जरांगेंचं नेत्यांना धडकी भरवणारं वक्तव्य

दहावी-बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर!

शिरुरमध्ये अजित पवारांचा सभांवर सभांचा तडाखा, शिवाजी आढळराव पाटलांना पराभवाची भीती?

‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .