अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, तिहार जेलमधून बाहेर येणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arvind Kejriwal Bail | आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांना आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. ते लवकरच तिहार जेलमधून बाहेर येण्याची शक्यता आहे. येत्या 25 मे रोजी दिल्लीची लोकसभा निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. 1 जूनपर्यंत अंतरिम तारीख असल्याने त्यांना 1 जूनपर्यंतच अंतरिम जामीन मिळाला. (Arvind Kejriwal Bail )

केजरीवाल यांना 1 जूनपर्यंतच अंतरिम जामीन

केजरीवाल यांना 1 जूनपर्यंतच अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र त्यांना 2 जून पासून स्वत:ला पुन्हा आत्मसमर्पण करावं लागणार आहे. जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय सुनावला असल्याची माहिती समोर आली.

आम आदमी पार्टीत उत्साहाचं वातावरण

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail ) हे आम आदमी पार्टीचा मोठा चेहरा आहे. त्यामुळे ते तुरूंगातून सुटल्यानंतर प्रचारात भाग घेऊ शकतात. केजरीवाल प्रचारात उतरल्याने मोठ्या प्रमाणात पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असणार आहे. दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती.

केजरीवाल लवकर सुटून यावे यासाठी कार्तकर्ते प्रयत्न करत होते. ते धरणे आंदोलनाला बसले होते. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये उत्साह निर्माण होताना दिसत आहे. केजरीवाल यांच्या जामीनाला केंद्राने विरोध केला आहे. 7 मे रोजी युक्तीवाद केला होता. कोर्टाने दोन्ही पक्षांचा निर्णय ऐकला आणि तो राखून ठेवला असून तो निर्णय आज जाहीर करण्यात आला.

ईडीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. तेव्हा सीएम केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला होता. ईडीच्या डिप्युटी डायरेक्टक भानु प्रिया यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. निवडणूक प्रचाराच्या अधारावर जामीन मंजूर करू नये, असं भानु प्रिया यांचं म्हणणं होतं.

News Title – Arvind Kejriwal Bail From Tihar Jail Till 1 June

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, विश्वासू आमदार लागले शरद पवार गटाच्या प्रचाराला!

शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय!

‘आमच्या सोबत या’ म्हणत मोदींकडून ऑफर, पवार म्हणाले ‘हे माझ्याचानं होणार नाही’

‘ही शेवटची संधी आहे तुम्हाला’; जरांगेंचं नेत्यांना धडकी भरवणारं वक्तव्य

दहावी-बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर!