‘आमच्या सोबत या’ म्हणत मोदींकडून ऑफर, पवार म्हणाले ‘हे माझ्याचानं होणार नाही’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असून त्यांनी नंदुरबार येथे जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आमच्यासोबत या. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, अशी खुली ऑफरच शरद पवार (Sharad Pawar) यांना दिली आहे. मोदी यांनी जाहीरसभेतून दिलेल्या या ऑफरवर शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

पवारांनी मोदींची ऑफर नाकारली

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींची ऑफर नाकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये होते. त्यांनी जाहीरसभेतून तुम्हाला सोबत येण्याची ऑफर दिली आहे, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त करत ते पुन्हा महाराष्ट्रात आले? सहाव्यांदा की सातव्यांदा आले? असा आश्चर्यचकीत सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला. त्यानंतर पवार यांनी मोदींची ऑफर नाकारत असल्याचं स्पष्ट केलं.

ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. मग ते सत्ताधारी असतील किंवा इतर अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही. व्यक्तीगत संबंधाचं सोडा पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर हिंदू, मुस्लिम आणि ईसाई या सर्व घटकांना एकत्र घेऊन देश पुढे न्यावा लागेल. एखाद्या समाजाबाबत वेगळी भूमिका मांडली तर समाजात गैर विश्वास होईल. मोदींची अलिकडील सर्व भाषणं ही समाजासमाजात गैर विश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशासाठी ते घातक आहेत, असं ते म्हणालेत.

माझी काही व्यक्तिगत मते आहेत. त्यांच्याशी संबंध हा वेगळा भाग आहे. धोरणातील संबंधातील मतं वेगळं आहे. या देशात संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आलीय. हे माझं मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करून तुरुंगात टाकलं. यामागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असंही पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणालेत. 4 जूननंतर राजकीय जिवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं त्यांना वाटतं. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत, असं मोदींनी म्हटलंय. मात्र काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, अशी ऑफर मोदींनी दिलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ही शेवटची संधी आहे तुम्हाला’; जरांगेंचं नेत्यांना धडकी भरवणारं वक्तव्य

दहावी-बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर!

शिरुरमध्ये अजित पवारांचा सभांवर सभांचा तडाखा, शिवाजी आढळराव पाटलांना पराभवाची भीती?

‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद