शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | शरद पवार गटाचे खासदार तथा शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी लोकसभेच्या निकालापूर्वीच सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेनंतर हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला कार्यसम्राट हवा की नटसम्राट?, अशी टीका अजित पवार गटाकडून करण्यात येत होती.

अखेर अमोल कोल्हे यांनी अभिनयाबाबत आपला निर्णय घेतला आहे. शिरुरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पाच वर्षे अभिनयातून संन्यास घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्या अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?

“शिरुर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी माझ्यावर आहे. या जबाबदारीच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. आज मी सात ते आठ लोकसभा मतदारसंघात प्रचार करतोय. त्यामुळे या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे”, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “गेल्या पाच वर्षांमध्ये मी फक्त एकच मालिका केलीये. पण, विरोधकांकडून वेगळाच प्रचार केला जातोय. जनसंपर्क कमी असण्याची काही वेगळी कारणं आहेत आणि ती विधानसभा निवडणुकीच्या वेळी समोर येतील.”, असं म्हणत कोल्हे यांनी विरोधकांना टोला लगावला.

अभिनयाबाबत अमोल कोल्हे यांचा मोठा निर्णय

“सगळे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला, तरी माझी काही हरकत नाही. या पाच वर्षांत शिरुर मतदारसंघातील जनतेला पुरेसा वेळ देण्याच्या दृष्टीने मी अभिनयातून ब्रेक घेत आहे”, अशी घोषणाच अमोल कोल्हे यांनी केली आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हे यांचा सामना अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होणार आहे. दोन्ही पक्षाकडून येथे सध्या जोरदार प्रचार केला जातोय. अशाच एका सभेत अजित पवार यांनी तुम्हाला कार्यसम्राट हवा की नटसम्राट?, असा सवाल करत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला होता.

News Title-  Amol Kolhe Decided To Take Break From Acting Career 

महत्वाच्या बातम्या-

“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं

गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती

प्रियंका चतुर्वेदींनी भरसभेत केली मोदींची नक्कल, म्हणाल्या…

शेतकऱ्यांनो अशाप्रकारे चेक करा PM किसान योजनेच्या 17 वा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही?

नरेंद्र दाभोलकर खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दिला सर्वात मोठा निकाल!