…म्हणून लोक लग्नानंतरही प्रेमप्रकरणात अडकतात; ‘ही’ आहेत कारणं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Extra Marital Relations | भारतात विवाह एक पवित्र नातेसंबंध मानले जाते. विवाहामुळे फक्त दोन व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे स्नेहाचे संबंध तयार होतात. पती आणि पत्नीचे नाते हे फार विशिष्ट आणि खास असते.आयुष्यभराची साथ म्हणून दोन व्यक्ती लग्न करतात.या नात्यात प्रेम, जबाबदाऱ्या आणि विश्वास महत्वाचे असते.

या तीन गोष्टी मजबूत आणि खऱ्या असल्या की अगदी मरेपर्यंत हे नाते निभावले जाते आणि ते विकसित होत असते. मात्र, काहीवेळा पती-पत्नीच्या नात्यात काही गोष्टीमुळे वाद निर्माण होतात. हे नातं जेवढं मजबूत असतं तेवढीच त्यातील विश्वासाची नाळ ही नाजुक असते. एकदा जर हा विश्वास तुटला की सगळं काही तुतून जाते.

नवरा-बायकोच्या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. तो एकदा का तुटला की पुन्हा संपादन करता येत नाही. या पलीकडे असे अनेक लोक आहेत, जे आपल्या जोडीदारावर जिवापाड प्रेम करतात. पण असे ही काही लोक आहेत, जे लग्न झाल्यानंतरही दुसरा जोडीदार शोधतात किंवा आपल्या जोडीदाराला धोका देतात.

काही व्यक्ती लग्न होऊनही विवाहबाह्य संबंधात अडकतात. यामुळे दोन आयुष्य खराब होतातच शिवाय बदनामी होते ती वेगळी. पण हे व्यक्ती असं का करतात? असं करण्यामागे या लोकांची मानसिकता (Extra Marital Relations) नक्की काय असू शकते? ते असं का करतात? असा अनेकांना प्रश्न पडतो. याचं उत्तर आता समोर आलं आहे. काही संशोधनामधून याचं उत्तर मिळालं आहे.

‘या’ कारणांमुळे व्यक्ती पार्टनरला धोका देतो

लग्न झाल्यानंतर व्यक्तीला त्याच्या पार्टनरकडून प्रेम, विश्वास हवा असतो. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात लाइफ पार्टनरचा सहभाग नसेल तर एकटेपणाची भावना निर्माण होते. यात जोडीदाराकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक नातं तुटण्याच्या दिशेने जातं.

पती-पत्नीच्या नात्यात पार्टनरला आपल्या प्रत्येक कामाची स्तुती व्हावी असं वाटतं, त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं गेलं नाही तर आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यांना असं वाटायला लागते की त्यांच्या पार्टनरला त्यांच्याशी काहीच फरक पडत नाही. यामुळे त्यांच्यात वेगळीच भावना निर्माण होते.

अशा परिस्थितीत ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपला आनंद शोधू लागतात. इतर व्यक्तीने जर त्यांना महत्व दिलं, त्यांना समजून घेतलं तर त्यांना ते आपलेपणजवळचे वाटू लागतात. हे पाहून अनेक लोक त्याकडे आकर्षित होतात. मग इथूनच विवाहबाह्य संबंधांना (Extra Marital Relations) सुरुवात होते.

अनेक वेळा आयुष्यात वाईट किंवा कठीण प्रसंग आला तर, त्या व्यक्तीला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. अशावेळी जर आपला पार्टनरच आपल्या सोबत नसेल तर त्यांना ते नाते महत्वाचे वाटत नाही. मग, अशावेळी ते बाहेरच्या व्यक्तीमध्ये जास्त गुंतले जातात.

नात्यात जर प्रेम आणि आनंद हवा असेल तर आपल्या पार्टनरच्या लहान-सहन गोष्टीकडे लक्ष द्या. त्यांच्या समस्या समजून त्यांना धीर द्या. त्यांना प्रेमाने परिपूर्ण करा. त्यांच्या यशाचे कौतुक करा. नात्यात पार्टनरला ते नेहमी महत्वाचे आहेत ही जाणीव करून द्या. तुमचे नाते नेहमी बहरत जाईल.

News Title – Extra Marital Relations

महत्त्वाच्या बातम्या-

नेत्यांवर दबाव टाकून बळजबरीनं केलं जातंय पक्षांतर?; वायकरांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपविरोधात रोष वाढला

शाहरुखच्या लाडक्या लेकीची बिग बींच्या नातवासोबत नाईट आऊट, व्हिडीओ तूफान व्हायरल

अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, विश्वासू आमदार लागले शरद पवार गटाच्या प्रचाराला!

शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय!

‘आमच्या सोबत या’ म्हणत मोदींकडून ऑफर, पवार म्हणाले ‘हे माझ्याचानं होणार नाही’