मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून लढणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ujjwal Nikam | महायुतीचा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवार अखेर ठरला आहे. भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन याचं तिकीट कापलं आहे. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपनं उज्जल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी दिली आहे. पूनम महाजन यांच्यासह भाजपनं मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट केला आहे.

उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी

उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे आता महायुतीचे उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

उत्तम मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्जल निकम आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, माधुरी दीक्षितने निवडणूक लढण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी जाहिर केली आहे.

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) आणि ईशान्य मुंबईतील भाजप खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्यासह आता उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांना भाजपनं दुसऱ्यांदा संधी न देता त्यांचं तिकीट कापलं आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम?

अनेक वर्षे विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेले उज्ज्वल निकम यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. कायदेपंडित म्हणून ओळखले जाणारे उज्ज्वल निकम यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर काम केलं आहे. यामध्ये निकम यांनी मुंबईवरील 26\11 चा दहशतवादी हल्ला, 1993 चे मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, खैरलांजी, सोनई येथील दलित अत्याचारात वकिल म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद चिघळला, मोदींची कंपनीतून हकालपट्टी!

“विखे परिवार पुरता हादरला आहे त्यामुळे…”, जिल्हाध्यक्षांच्या आरोपांनी नगरच्या राजकारणात खळबळ

“सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, पराभूत होण्यापेक्षा अर्ज माघारी घ्या”

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला सर्वांत मोठा धक्का!

मतदान केल्यानंतर शिव ठाकरेची पोस्ट व्हायरल, म्हणाला…