“सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, पराभूत होण्यापेक्षा अर्ज माघारी घ्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nagar Political News | नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुजय विखे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. दोघांमध्ये चांगली चुरस रंगणार असून नीलेश लंके हे पहिल्यांदा खासदारकी लढत आहेत. असं असलं तरीही नीलेश लंके यांचं पारडं जड पाहायला मिळत आहे. यामध्ये आता सुजय विखे यांना डमी उमेदवाराचा आधार घ्यावा लागत असल्याच्या चर्चा आहेत.

सुजय विखेंविरोधात नीलेश लंके यांचं पारडं जड वाटत असल्याच्या चर्चा आहेत. म्हणूनच आता सुजय विखे पराभवाच्या भीतीने डमी उमेदवार देणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला. डमी उमेदवार देऊन राजकारणाचा खेळ विखे खेळत असल्याचं फाळके म्हणालेत. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी सुजय विखे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं.

“माझे मित्र सुजय विखे पाटील…”

“माझे मित्र सुजय विखे पाटील यांना विजयासाठी डमी उमेदवाराचा आधार घ्यावा लागतो. यावरूनच नगरच्या लोकसभा मतदारसंघाचा निकाल स्पष्ट झालाय. आता पराभूत होण्याची नामुष्की होण्यापेक्षा अर्ज माघारी घेतला तर सन्मान राहील. मित्र म्हणून माझा सुजय विखे यांना सल्ला आहे,” असं रोहित पवार यांनी ट्वीट केलंय.

डमी उमेदवार

पारनेरच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नीलेश साहेबराव लंके (रा. कामोठा, जिल्हा. रायगड) यांच्या नावाचा समावेश करून लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरून विखे पाटील डमी उमेदवार उभा करून राजकारणाचा अगळावेगळा खेळ खेळत आहेत. गेली 50 वर्षे त्यांनी हेच केलं. नीलेश लंके यांच्या उमेदवारीने विखे पाटील परिवार पुरता हादरला असल्याचा दावा शरदचंद्र पवार गटातून होतोय.

रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात लढत आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून आनंत गिते यांना सामना करावा लागणार आहे. या दोघांच्या नावाचे साधर्म्य असणारे उमेदवार रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत. तर मावळमध्ये महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्याही नावाचा साधर्म्य असणारे उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघात आहे.

News Title – Nagar Political News Rohit Pawar Suggest To Sujay Vikhe About Withdraw Candidate Form

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव नरमले, अनंत गीतेंसाठी धोक्याची घंटा!

‘आमच्या पप्पांनी गंम्पती आणला’ फेम चिमुकला आता ‘या’ मालिकेत दिसणार

भाजपचा आधीचा खासदार निष्क्रीय, त्यात आता उपरा आणून ठेवलाय- प्रणिती शिंदे

कृणाल पांड्या झाला दुसऱ्यांदा बाबा, पोस्ट करत दिली माहिती

भाजप उमेदवाराचा अर्ज भरायला शिवसेना-राष्ट्रवादीवाले गैरहजर, महायुतीत नव्या वादाची ठिणगी