छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला सर्वांत मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, महाविकास आघाडीकडून इथे चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आलीये. दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र, या जागेवर आता महायुतीचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनोज घोडके यांची उमेदवारी कायम राहिल्यास त्याचा महायुतीला मोठा फटका बसू शकतो. यामुळे ओबीसींच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

अजितदादांचा शिलेदार निवडणूक रिंगणात

महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला असताना देखील मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीच्या गोट्यात चिंता वाढली आहे. येथे राष्ट्रवादीत मोठी फुट पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मनोज घोडके हे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. यासोबतच ते समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत.भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.

घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मंत्री भुजबळ यांनी आयुष्यभर इतरांना तिकीटं देण्याचं काम केलं मात्र त्यांना तिकीट दिलं जात नाहीये. महायुतीला ओबीसीच्या मतांची गरज नाही. आमचा प्रतिनिधी असावा म्हणून अर्ज दाखल केलाय.’, असं रोखठोकपणे मनोज घोडके यांनी म्हटलं आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय.

शिंदे गटाचं टेंशन वाढलं

काही दिवसांपूर्वीच या जागेवर मराठा आंदोलनाचे नेते विनोद पाटील यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची भेटदेखील घेतली होती. महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकतीने ही निवडणूक लढवणार असा निर्धारच त्यांनी केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच (Chhatrapati Sambhajinagar ) त्यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट उमेदवारी अर्ज भरल्याने शिंदे गटाचं टेंशन वाढलंय.

भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज घोडके यांच्या उमेदवारीमुळे मंत्री संदिपान भुमरे यांना फटका बसू शकतो. त्यांच्या मतांवर याचा परिणाम होऊ शकतो. आता महायुतीचे प्रमुख नेते यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

News Title : Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency ncp leader manoj ghodke independent candidate

महत्त्वाच्या बातम्या –

मतदान केल्यानंतर शिव ठाकरेची पोस्ट व्हायरल, म्हणाला…

महाराष्ट्रात आणखी एका बँकेत घोटाळा, भाजप पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ

आर्थिक प्रगतीसाठी ‘या’ 3 गोष्टींचा अवलंब करा; मिळेल भरपूर यश

तारक मेहताच्या सोढीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, बेपत्ता होण्याच्या आधी….

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महायुतीला उमेदवार मिळेना, वैतागलेले कार्यकर्ते बारामतीत प्रचाराला दाखल