मतदान केल्यानंतर शिव ठाकरेची पोस्ट व्हायरल, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shiv Thackeray | मनोरंजविश्वातील तारा शिव ठाकरे (Shiv Thackeray Voting) अनेक कारणाने चर्चेत असतो. अमरावती येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिवने बिग बॉस मराठी शोच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तो आता केवळ महाराष्ट्रतच नाहीतर देशातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. हिंदी बिग बॉसमधून त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या कामानिमित्त शिव ठाकरे (Shiv Thackeray Voting) मुंबई येथे असतो. मात्र आज देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा सुरू आहे. लोकशाही बळकटीसाठी त्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान केलंय. (Shiv Thackeray Voting)

शिव ठाकरेनं मतदानाचा बजावला अधिकार, पोस्ट व्हायरल

शिवने आज मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.  फोटोमध्ये तो आपल्या बोटाची शाई दाखवताना दिसत आहे. त्या फोटोत त्याची आजी देखील दिसत आहे. प्रत्येकाने मतदान करा असं आवाहन त्यानं केलं आहे. त्याने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. (Shiv Thackeray Voting)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)


आज अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, वर्धा या आठ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगत आहे. शिव ठाकरे हा अमरावतीचा असून तो सध्या मुंबईमध्ये असतो. पण मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी तो मुंबईहून अमरावतीला आला. त्याने मतदान केलं. दरम्यान मध्यंतरी शिव ठाकरे आणि बिगबॉस फेम अब्दु एका मनी लॉड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आले होते. याप्रकरणाची ईडीने दखल घेतल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या.

मराठी बिगबॉसचा दावेदार

शिव ठाकरे हा मराठी बिग बॉस 2 च्या विजयाचा दावेदार आहे. त्यानंतर त्याला हिंदी बिग बॉस शोमधून ऑफर आली. त्याने हिंदी बिग बॉसमध्ये चांगली कामगिरी केली. हिंदी बिगबॉसपासून त्याला देशभरातील चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं.  बिग बॉसचं अँकरिंग करणारा अभिनेता सलमान खानला देखील त्याचा स्वभाव आवडला. त्याने अनेकदा शिव ठाकरेचं कौतुक देखील केलं होतं.

हिंदी बिगबॉसनंतर शिव ठाकरेला अनेक दिग्गजांनी भेटीसाठी बोलवलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिव ठाकरे याला बिग बॉस शो संपल्यानंतर भेटीसाठी बोलवलं. त्यावेळी शिव ठाकरे या मराठी मुलाचं राज ठाकरे यांनी अभिनंदन करत कौतुक केलं.

News Title – Shiv Thackeray Voting At Amravati Loksabha 2024

महत्त्वाच्या बातम्या

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला

अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक

सचिन आणि सु्प्रिया पिळगांवकर यांची मुलगी खरंच दत्तक आहे का?, श्रियाने स्वतःच सत्य सांगितल्यानं मोठी चर्चा

“…त्यांना फक्त एकच गोष्ट मनापासून करायची इच्छा होती”, ऋषी कपूर यांच्याबद्दल मुलीचा मोठा खुलासा