अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची आता एकच चर्चा सुरु आहे.

रायगडमधील मोर्ब्यात शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल एक वक्तव्य केलं. यावेळी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह अनंत गीते, सुषमा अंधारे, सुभाष देसाई, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“मतदानाच्या दिवशी तुमचा नवरा मटण आणा म्हणाला तर आणू नका. बिर्याणी बनवा म्हणाला, तर बनवू नका. तुम्ही त्यांना म्हणा, रात्रीच झोपेच्या वेळी फजरची नमाज पठण करा आणि पहिल्यांदा माझ्याबरोबर येऊन मतदान करा. नाहीतर आपली सवय आहे. बोलतील सुट्टीचा दिवस आहे. सकाळी उशिरा उठू. मराठी लोक बिचारे लवकर उठतात.”

”माझे काही अक्कलवान भाऊ आहेत, ते सकाळी १२ वाजता उठतात. बायकोला रात्रीच म्हटले असतील. घोष घेऊन ये. बिर्याणी वगैरे बनवू. सकाळी उठून आंघोळ करून खाऊ. त्यानंतर म्हणतील थोड्या वेळ झोपू. त्यानंतर थेट पाच वाजता उठतील”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुस्लीम मतदार नाराज होणार?

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा फटका सुद्ध बसू शकतो. मतदानावर या गोष्टीचा काय परिणाम होईल?, हे येणारा काळच सांगू शकतो.