ICC | टीम इंडियाचा माजी खेळाडू डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज म्हणून युवराज सिंहची ओळख आहे. एवढंच नाहीतर त्याने केलेल्या पराक्रमाचं फळ त्याला आगामी टी 20 विश्वचषकात मिळणार आहे. 2007 रोजी युवराजने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता, हा पराक्रम त्याने इंग्लंडविरोधात केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तब्बल 17 वर्षानंतर त्याला त्या कामगिरीचं फळ मिळत आहे. आयसीसीने आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी युवराज सिंहची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. (ICC)
याआधी धावपटू उसेन बोल्टची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयपीएलची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच टी 20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. 1 जून ते 29 जूनला अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी 20 विश्वचषक होणार आहे. यावेळी युवराज सिंह हा ब्रँड अँबेसिडर असणार आहे, अशी माहिती (x) ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. (ICC)
Who will make it to India’s squad for the ICC Men’s #T20WorldCup 2024? 🤔
Event Ambassador Yuvraj Singh has some exciting prospects on his list 👀https://t.co/zMjeIig7qF
— ICC (@ICC) April 26, 2024
युवराजची प्रतिक्रिया
2007 टी 20 विश्वचषकात युवराज सिंहने तब्बल 6 चेंडूत 6 षटकार लगावले होते. तो बोलत असताना म्हणाला की, “क्रिकेटमधील माझी सर्वोच्च आठवण ही विश्वचषकातील आहे. ज्यामध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्यामुळे आता टी 20 विश्वचषकाचा भाग होणं हे माझ्यासाठी रोमांचक आहे. यंदाच्या विश्वचषकाचं सर्वात मोठं आयोजन करता येईल, असा मला विश्वास आहे. वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट खेळण्याची वेगळीच मजा आहे. तर अमेरिकेच्या क्रिकेटचा विस्तार वाढताना पाहायला मिळत आहे,” याचा अभिमान आहे. (ICC)
टी 20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा, हे संघ टी 20 विश्वचषकामध्ये खेळणार आहेत. (ICC)
टी 20 विश्वचषकामध्ये अ गटामध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका या संघांचा समावेश असणार आहे.
तर ब गटमध्ये इंगलंड ऑस्ट्रेलिया, नामिबिया, ओमान, स्कॉटलँड संघ खेळतील.
क गटामध्ये अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज,युगांडा, पापुआ न्यू गिनी संघांचा समावेश आहे.
तसेच ड गटामध्ये द. आफ्रिका, नेदरलँड्स, श्रीलंका बांगलादेश, नेपाळ हे संघ असणार आहेत.
News Title – ICC Big Decision Yuvraj Singh Brand Ambassador Of T20 World Cup 2024
महत्त्वाच्या बातम्या
अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?
रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला
अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक
“…त्यांना फक्त एकच गोष्ट मनापासून करायची इच्छा होती”, ऋषी कपूर यांच्याबद्दल मुलीचा मोठा खुलासा