मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महायुतीला उमेदवार मिळेना, वैतागलेले कार्यकर्ते बारामतीत प्रचाराला दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Thane Loksabha l लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वच नेतेमंडळी अगदी जोमाने उतरलेले दिसत आहेत. मात्र असे असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणल्या जाणाऱ्या ठाण्यात महायुतीला अद्याप उमेदवार ठरवता आलेला नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण ठाण्यात महायुतीच्या कोणत्या नेत्याला ही जागा देयची याचा निर्णय अद्याव झालेला नाही. या कारणामुळे ठाण्यातील कार्यकर्ते देखील अस्वस्थ झाले आहेत.

माविआकडून राजन विचारे निडवणुकीच्या रिंगणात :

ठाण्यात महायुतीच्या उमेदवाराकडे सर्व राज्यच लक्ष लागलेलं आहे. असे असताना ठाण्यातील उमेदवार लवकरात लवकर जाहीर करा अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अशातच महायुतीचा उमेदवार 2 मे रोजी जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे. दिग्गज नेत्यांकडून जितका जास्त उशीर होईल तितका कमी दिवस प्रचाराला मिळेल असं कार्यकर्त्यांकडून बोललेलं जात आहे.

ठाण्यात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे निडवणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच ठाकरेचे निष्ठावंत विचारेंना पुन्हा लोकसभेला संधी दिली आहे. तर ठाण्यातील महायुतीचा उमेदवार कधी मिळणार असे नागरिकांसह कार्यकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे.

Thane Loksabha l लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असणार? :

याशिवाय ठाण्यातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न महायुतीमधील भाजप कार्यकर्ते, शिंदे गटाचे नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते विचारत आहेत. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील बारामतीला निघून गेले असल्याचं चित्र दिसत आहे.

बारामतीत लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते देखील जोरात करताना दिसत आहेत. तसेच महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काहीच काम राहिलेलं नसल्याचं चित्र दिसत आहे.

News Title –  Thane Loksabha News

महत्त्वाच्या बातम्या –

“हे तेच लोक आहेत, ज्यांना वाटतं कमळाचं बटण दाबलं की…”, किरण मानेंचा थेट प्रहार

लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव नरमले, अनंत गीतेंसाठी धोक्याची घंटा!

‘आमच्या पप्पांनी गंम्पती आणला’ फेम चिमुकला आता ‘या’ मालिकेत दिसणार

भाजपचा आधीचा खासदार निष्क्रीय, त्यात आता उपरा आणून ठेवलाय- प्रणिती शिंदे

कृणाल पांड्या झाला दुसऱ्यांदा बाबा, पोस्ट करत दिली माहिती