“हे तेच लोक आहेत, ज्यांना वाटतं कमळाचं बटण दाबलं की…”, किरण मानेंचा थेट प्रहार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Mane | मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या स्पष्टोक्तीसाठी तसेच बेधडक वक्तव्यासाठी किरण माने नेहमी चर्चेत असतात. काही महिन्यांआधी किरण माने (Kiran Mane) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत शिवबंधन बांधलं. मराठी बिग बॉस माध्यमातून किरण माने (Kiran Mane) महाराष्ट्रभरात पोहोचले. सोशल मीडिया आणि किरण माने (Kiran Mane) एक वेगळंच नातंच तयार झालं आहे. ते नेहमी आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी राजकीय पोस्ट केलीये. सध्या ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाचं आश्वासन दिलं होतं. तसेच देशातील गॅसच्या दरात घट होईल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. सध्या गॅसचा दर हा 1100 रूपये आहे. मोदी सरकार देशात आलं तशी नोटबंदी करण्यात आली. जीएसटी कर देखील लागू केला गेला. महागाई कमी करण्याचं वचन हे नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. मात्र 10 वर्षांआधीची महागाई आणि दहा वर्षानंतरच्या मुलभूत सोयीसुविधांचे दर हे दुप्पट पाहायला मिळत आहेत. असं असूनही काही लोकं मोदींचा उदोउदो करतात, अशांना उद्देशून आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट केली आहे.

किरण माने यांची पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी पोस्ट करत लिहिलं आहे, “फेसबुकवर एखाद्या तिरक्या बिल्डींगचा फोटो असतो. त्यावर कॅप्शन असते… ‘इस फोटो को लाईक करतेही बिल्डींग सिधी हो जायेगी’…हे वाचून जे लोक लाईक करतात, ते तेच लोक असतात ज्यांना वाटतं कमळाचं बटन दाबलं की देशाचा विकास होईल”, अशी मिश्कील पोस्ट किरण माने यांनी केलीये.


किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमधून अप्रत्यक्षरित्या अंधभक्तांचा संदर्भ दिला आहे. जे अंधभक्त आहेत त्यांना वाटतं की नरेंद्र मोदींना मतदान केल्यावर देशाचा अपोआप विकास होईल असं म्हणत त्यांनी अंधभक्तांना आणि मोदी सरकारला आपल्या शैलीतून सुनावलंय. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

किरण माने यांनी केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एकाने “एवढे मात्र सांगू शकतो ही पोस्ट अकरा लोकांना पाठवा डोक्यात प्रकाश पडेल” अशी कमेंट केलीये. त्यावर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे की, “कोण म्हणतं विकास नाही झाला…….अदानी अंबानी ची संपत्ती किती वाढली बघा”, अशी कमेंट केलीये. तर तिसऱ्याने लिहिलं की, “काय टोला दिला राव,,,,,,, एकदम सही”, अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टवर येत आहेत.

Screenshot 2024 04 27 131349.png