लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव नरमले, अनंत गीतेंसाठी धोक्याची घंटा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bhaskar Jadhav | लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष होणार आहे. मात्र, या दोन्ही युती पक्षात सध्या उमेदवारीवरून नाराजीच्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कुठे बंडखोरी केली जातेय तर कुठे थेट आव्हान दिलं जातंय. त्यामुळे दोन्ही आघाडीमधील पक्ष श्रेष्ठींना प्रचाराऐवजी या नाराज नेत्यांच्या मनधरणीकडेच अधिक लक्ष घालावं लागत आहे. अशात रायगड लोकसभा मतदार संघ चर्चेत आला आहे.

रायगडमध्ये ठाकरे गटाकडून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सध्या गीते आणि भास्कर जाधव यांच्यातील नाराजी नाट्य अधिक चर्चेत आलं आहे. भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे प्रचारक आहेत. 25 एप्रिलरोजी गीते यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भास्कर जाधव देखील उपस्थित होते. मात्र या सभेत गीते बोलत असताना अचानक भास्कर जाधव यांनी माईक हातात घेतला आणि त्यांना शब्द मागे घेण्याची विनंती करत कठोर शब्दात खडेबोल सुनावले.

भास्कर जाधव-अनंत गीते यांच्यात नाराजीनाट्य

यामुळे ठाकरे गटातील नाराजी दिसून आली. गुहागरमध्ये झालेल्या सभेत भास्कर जाधव यांनी अनंत गीते यांचे भाषण चालू असतानाच माईक हातात घेऊन भर सभेत त्यांना सुनावलं. यावेळी अनंत गीते मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, मागची लोकसभा निवडणूक मी तटकरेंविरूद्ध लढलो नाही, तर मी भास्करराव जाधवांविरोधात लढलो. अनंत गीते असे बोलताच भास्कर जाधवांनी माईक हातात घेतला आणि त्यांना असे विधान टाळण्याची विनंती केली. तसंच पुढे त्यांनी आपलं स्पष्टीकरणही दिलं. मी राष्ट्रवादीत होतो, म्हणून तटकरे यांच्या बाजूने होतो. मी पक्षात राहून कधीही गद्दारी केली नसल्याचं ते म्हणाले.

यापुढे अनंत गीते यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. ‘तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलंच नाही. तटकरेंचं इथे काही नाही. कालही नव्हतं, आजही नाही. आता भास्करराव जाधव (Bhaskar Jadhav) आणि अनंत गिते आम्ही एक आहोत.’, असं अनंत गीते म्हणाले. त्यामुळे यांच्यातील नाराजी ही या प्रसंगावरून उघड दिसून आली. त्यातच यापूर्वी झालेल्या अनंत गीते यांच्या सभेत त्यांनी सपशेल दांडी मारली होती. दोन्ही नेत्यामधील नाराजी समोर आल्याने याचा परिणाम हा निवडणुकीवर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

भास्कर जाधव नरमले

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आक्रमक होऊन प्रचार करतील अशा चर्चा होत्या. ते सध्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावत आहेत. प्रचारही जोरदार करत आहेत. मात्र, पूर्वीचा आक्रमकपणा जाधव यांनी दाखवला नाहीये.

काही महिन्यांपूर्वी राणे पिता-पुत्र आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, त्यानंतर भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांनी समजदारी दाखवून वादावर पडदा टाकला होता. आता अनंत गीते आणि भास्कर जाधव यांच्यातील नाराजी नाट्य समोर येत आहे. जाधव (Bhaskar Jadhav) यांची नरमाई ही गीते यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असंही आता राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.

News Title : Bhaskar Jadhav and Anant geete dispute

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपचा आधीचा खासदार निष्क्रीय, त्यात आता उपरा आणून ठेवलाय- प्रणिती शिंदे

कृणाल पांड्या झाला दुसऱ्यांदा बाबा, पोस्ट करत दिली माहिती

भाजप उमेदवाराचा अर्ज भरायला शिवसेना-राष्ट्रवादीवाले गैरहजर, महायुतीत नव्या वादाची ठिणगी

“पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, ते कधीही स्टेजवर रडू शकतात”

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर!