भाजपचा आधीचा खासदार निष्क्रीय, त्यात आता उपरा आणून ठेवलाय- प्रणिती शिंदे

Praniti Shinde | सोलापूर मतदार संघात महाविकास आघाडीकडून कॉँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या लोकसभेसाठी उभ्या राहिल्या आहेत. तर, महायुतीमधून इथे भाजप नेते राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभेच्या मतदानाचा दुसरा टप्पा कालच पार पडला. आता लवकरच तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल.

सोलापूरमध्ये सध्या कॉँग्रेस आणि भाजप या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रणिती शिंदे यांनी एका प्रचार सभेत राम सातपुते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘दोन-दोन खासदार निवडले. पण कामाच्या कोऱ्या पाट्या आहेत. अनुभव नाही, काम नाही. तरीही तुम्ही मोठ्या मनाने त्यांना निवडून आणलय. मात्र, दोघांनीही खासदारकी वाया घालवली.’, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी टोलेबाजी केली.

महाविकास आघाडीकडून उभ्या राहिलेल्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. याच सभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या यापूर्वीच्या दोन्ही खासदारांच्या कामगिरीबाबत टीका करत भाजपवर निशाणा साधला. ‘दोन-दोन खासदार निवडले.पण कामाच्या पाट्या कोऱ्या आहेत. आता उपरा आणून ठेवलाय.’, असा टोला प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना लगावला.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झालाय.कुठे पाणी नाहीये तर कुठे वेगळ्याच समस्या आहेत. उजनीचं नियोजन नाहीये, कांदा निर्यात बंद केलीये. गुजरातचा कांदा बाहेर जातोय. हे सगळं करून महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय. त्यात अजून भर म्हणजे जीएसटीचं राक्षस उरावर येऊन बसलंय. 15 लाखांच्या अमिषामुळे 10 वर्षे मागे गेलो आहोत. हे पाप भारतीय जनता पक्षाचे आहे. तुमच्या मताची भाजपला किंमत राहिलेली नाही. आणखी किती अपमान सहन करणार आहात?, असा संतप्त सवाल यावेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मतदारांना केला.

भाजपने जाती पातीची आणि धर्मची कीड लावली

यावेळी प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. तुम्ही सगळ्यांनी पंतप्रधानांचे पर्वाचे भाषण ऐकले असेलच.ते फक्त दिशाभूल करत आहेत. कामाबद्दल बोलत नाहीयेत. फक्त जाती पातीची आणि धर्माची कीड भारतीय जनता पक्षाने देशाला लावली आहे. आपल्या लोकशाहीला दृष्ट लावली आहे. पंतप्रधान देशाला संभाळणारा असला पाहिजे. तो पक्षाचा नसतो देशाचा असतो. पर्वा खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं. असं प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या.

यावेळी त्यांनी राम मंदिराचा देखील उल्लेख केला. भाजप संविधान बदलण्याची भाषा करत आहे. त्यामुळे ही लढाई एकट्याची नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपला टार्गेट केलं. आता प्रणिती शिंदे यांच्या टीकेला राम सातपुते काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

News Title : Praniti Shinde target Ram Satpute

महत्त्वाच्या बातम्या –

“पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, ते कधीही स्टेजवर रडू शकतात”

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर!

“मी पदर पसरते, मला शेवटची…”, रडवेली होऊन पंकजा मुंडे यांची बीडकरांना कळकळीची विनंती

‘मुस्लिम मत हवं, मग मुस्लिम उमेदवार का नाही?’, बड्या नेत्याची कॉँग्रेसवर जाहीर नाराजी

पंजाबच्या तडाखेबाज खेळीपुढे शाहरुखची बोलती बंद; टी20 क्रिकेटमधील सारेच रेकॉर्ड्स झाले चकनाचूर