पंजाबच्या तडाखेबाज खेळीपुढे शाहरुखची बोलती बंद; टी20 क्रिकेटमधील सारेच रेकॉर्ड्स झाले चकनाचूर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

KKR vs PBKS | अभिनेता शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या घरच्याच मैदानावर पंजाबने धु-धु धुतलं. PBKS च्या फलंदाजांनी केलेल्या शानदार खेळीपुढे केकेआरने गुडघेच टेकले. पंजाबने T20 क्रिकेटच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड्स बनवलेही आणि तोडले देखील.

आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त स्कोअर आव्हानात्मक लक्ष्य समजलं जातं. मात्र, 2024 च्या या सीझनमध्ये 200 पेक्षाही अधिक धावांचा डोंगर केला जात आहे. काल (26 एप्रिल) झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात रेकॉर्ड्सची रांगच लागली.

ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात कोलकाताने पंजाबला विजयासाठी 262 धावांच टार्गेट दिलं होतं. पंजाबच्या टीमने फक्त 2 विकेट गमावून 18.4 ओव्हरमध्येच विजयी लक्ष्य गाठलं. जॉनी बेयरस्टो रन चेजमध्ये हीरो ठरला. त्याने तूफान 108 धावांची खेळी केली. त्याला शशांक सिंहनेही जबरदस्त साथ देत विजयी लक्ष्य गाठण्यात मदत केली.

पंजाबने लावली रेकॉर्ड्सची रांग

T20 च्या इतिहासात सर्वात मोठं लक्ष्य चेज करण्याचा रेकॉर्ड पंजाबने केला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकाने ही कामगिरी केली आहे. त्यांनी मागच्यावर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध 259 धावांचा पाठलाग केला होता. IPL मध्ये सर्वाधिक धावसंख्या चेज करण्याचा रेकॉर्ड राजस्थानच्या नावावर होता. त्यांनी दोनवेळा 224 धावांच लक्ष्य चेज केलंय.

ईडन गार्डन्सवर केकेआरने प्रथम बॅटिंग करताना 261 धावा बनवल्या.ही सर्वाधिक धावसंख्या आहे. 2 तासांच्या आत पंजाबने हे सर्व रेकॉर्ड मोडून 262 धावा केल्या. दोन्ही टीम्सकडून या सामन्यात 42 सिक्स मारण्यात आले. T20 सामन्यात सर्वाधिक सिक्सचा हा रेकॉर्ड झाला. फक्त पंजाबकडून 24 सिक्स मारले गेले. IPL च्या एका इनिंगमधील हे सर्वाधिक सिक्स आहेत.

KKR vs PBKS सामन्यात तुटले सर्वच रेकॉर्ड

कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांनी मिळून 523 धावा केल्या. संयुक्तरित्या दुसऱ्यांदा इतक्या धावा झाल्या आहेत. यापूर्वी मुंबई-हैदराबाद मॅच मध्येही इतक्याच धावा झाल्या होत्या. यासोबतच दोन्ही संघांकडून दोन्ही ओपनर्सनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या. आयपीएल इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.

News Title –  KKR vs PBKS Punjab Kings broke many records in T20 cricket