‘शरद पवारांनी शिवसेनेचा द्वेष तर केलाच’, मात्र चार वेळा फूट पाडली; ‘या’ नेत्याने केला गंभीर आरोप

Sharad Pawar l लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय नेते सत्ताधारी आणि विरोधकणांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच केसरकर यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट देखील केला आहे.

शरद पवारांनी कायमच शिवसेनेचा द्वेष केला :

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. शरद पवारांनी कायमच शिवसेनेचा द्वेष केला आहे. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसोबत हातमिळवणी केली आहे. शरद पवार शिवसेनेचा पराकोटीचा द्वेष देखील करतात, पवारांनी शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी सोडली नाही’, अशी खोचक टीका राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

2017 मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे राज्य येण्याची शक्यता होती. मात्र शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही भाजपबरोबर येणार नाही असे शरद पवारांनी स्पष्ट सांगितले होते असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. मात्र दिपककेसरकार यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Sharad Pawar l बाळासाहेबांनी शेवटपर्यंत शब्द पाळला तर शरद पवारांनी कायमच शब्द मोडला :

1989 च्या दरम्यान दिना बामा पाटील यांच्या मुलुंड येथील प्रचारसभेत शरद पवारांनी बाळासाहेबांवर व्यक्तिगत जोरदार टीका केली होती. मात्र त्याच मैदानात बाळासाहेबांनी अवघ्या सात दिवसांत सभा लावून पवारांना सडेतोड उत्तर देखील दिले होते. मात्र त्यानंतर मनोहर जोशी यांनी मध्यस्थी केली आणि या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही असे ठरवले.

मात्र बाळासाहेबांनी शेवटपर्यंत हा शब्द पाळला तर शरद पवारांनी शब्द कायमच मोडला असा आरोप करत शिवसेनेमध्ये शरद पवारांनी चार वेळा फूट पाडली अशी गहिरी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच ‘शरद पवार हे ज्येष्ठ नेते तर आहेतच. परंतु त्यांनी आतापर्यंत काय भूमिका घेतल्या आहेत आणि त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होते. अशावेळी राज्याचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, परंतु आपले कौंटुबिक राजकारण शाबूत राहिले पाहिजे, या त्यांच्या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे.

News Title : Dipak Kesarkar Against Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

चालत्या कारला अचानक आग लागली तर जीव वाचवण्यासाठी या गोष्टी करा!

आता घरबसल्या काढता येणार लेबर कार्ड; या स्टेप्स फॉलो करा

संकष्टी चर्तुर्थीच्या शुभ दिनी ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?