पुढील तीन दिवस धोक्याचे; राज्यात उष्णतेच्या लाटा कहर करणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहार. मात्र असे असताना देखील राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचं संकट देखील कायम आहे. अशातच हवामान विभागाने आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

पुढच्या तीन दिवसांत उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागणार :

हवामान विभागाने वर्तवला अंदाजानुसार मुंबई आणि ठाण्यासह कोकणात देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढण्याची दात शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना देखील कडक उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय उत्तर कोकणात 28 आणि 29 एप्रिलला उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा 40 ते 42 अंशावर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी देखील 15 आणि 16 एप्रिल या दोन दिवसांत मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जाणवली आहे. त्यावेळी नवी मुंबईत पारा 41 अंश तर पनवेलमध्ये 43 अंश सेल्सियस होता.

Maharashtra Weather l राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट :

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा व हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान हवेचा वेग 30-40 किमी प्रतितास असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान देखील होत आहे. त्यामुळे नांदेड, जालना, परभणी, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे.

तसेच राज्यात अवकाळी पावसाचे संकट देखील कायम आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

News Title : Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या –

‘शरद पवारांनी शिवसेनेचा द्वेष तर केलाच’, मात्र चार वेळा फूट पाडली; ‘या’ नेत्याने केला गंभीर आरोप

चालत्या कारला अचानक आग लागली तर जीव वाचवण्यासाठी या गोष्टी करा!

आता घरबसल्या काढता येणार लेबर कार्ड; या स्टेप्स फॉलो करा

संकष्टी चर्तुर्थीच्या शुभ दिनी ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट