मोठी बातमी! राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Swine Flu | महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. मालेगावात स्वाइन फ्लूने दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली आहे.

मालेगाव महापालिकेकडून नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलंय. गेल्या 20 दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. मालेगावमधील 63 वर्षीय महिलेचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.

यानंतर आता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री अहिरे यांनी पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच स्वाइन फ्लू बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असंही त्या म्हणाल्या आहेत.

स्वाईन फ्लू होण्यामागील कारण काय?

स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग (Swine Flu) होतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये याचा लवकर संसर्ग होतो.

त्यामुळे अशा व्यक्तींनी गर्दीत जायला टाळले पाहिजे. तसंच वेळेच्या व्यत्यय न करता लगेच उपचार घेणे आवश्यक आहे. संक्रमित झालेल्या व्यक्तीने शक्यतो आयसोलेटेड व्हायला हवे. यामुळे याचे संक्रमण होणार नाही.

स्वाईन फ्लूची लक्षणे

सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या जाणवतात.
घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो.
त्यामुळे प्रवास ( Swine Flu) करताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्ककहा वापर करावा.
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.

News Title –  Swine Flu Two Died In Malegaon