चालत्या कारला अचानक आग लागली तर जीव वाचवण्यासाठी या गोष्टी करा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Car Fire l उन्हाळ्यात पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. जर तुम्ही पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार वापरणारे असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुमच्या कारला कधीही आग लागली तर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

गाडीत अग्निशामक यंत्र ठेवा :

अपघातानंतर अनेकवेळा वाहनांना आग लागण्याच्या घटना घडतात आणि अशावेळी बहुतांश प्रवासी सेंट्रल लॉक सिस्टीममुळे वाहनात अडकतात. अशा परिस्थितीत एखाद्याला वाहनातून बाहेर पडता येत नसेल, तर त्याचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे वाहनाला आग लागो किंवा न लागो अशा परिस्थितीत बाहेर पडण्याची युक्ती प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे.

अग्निशामक यंत्राला अग्निशमन यंत्र असेही म्हणतात. हा एक लहान गॅस सिलेंडर आहे, जो आग विझवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट (NaHCO3) किंवा मोनो अमोनियम फॉस्फेटने भरलेला असतो. ही भुकटी बाहेर काढण्यासाठी नायट्रोजन वायूही भरला जातो. सहसा अग्निशामक यंत्र हे आपत्कालीन परिस्थितीत लहान आग विझवण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात.

Car Fire l कार ग्लास कटर टूल :

हा ग्लास कटरचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि थेट काचेवर स्कोअर लाइन तयार करण्यासाठी वापरला जातो. स्कोअर लाइनसह काच फोडून तुकडे वेगळे केले जातात. त्याच्या मदतीने तुम्ही गाडीची काच फोडून बाहेर पडू शकता.

गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक :

जेव्हा तुम्ही तुमच्या कारच्या शोरूमला जाता त्यावेळी सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे. सर्व्हीसिंग वेळी तुमच्या कारमध्ये काही समस्या असल्यास तो दुरुस्त करून घ्या. तसेच वाहनाला आग लागण्यामागील एक कारण म्हणजे वाहनात असलेली विद्युत यंत्रणा. त्यामुळे वेळोवेळी वाहनाची सर्व्हिसिंग करून तुम्ही तुमच्या वाहनाला आग लागण्याच्या भीतीपासून दूर करू शकता.

News Title : Do these things if your car suddenly catches fire

महत्त्वाच्या बातम्या –

आता घरबसल्या काढता येणार लेबर कार्ड; या स्टेप्स फॉलो करा

संकष्टी चर्तुर्थीच्या शुभ दिनी ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला