संकष्टी चर्तुर्थीच्या शुभ दिनी ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ६

वृषभ:- घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तमरित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. सज शुभ दिवस आहे. अचानक धनलाभ संभवतो. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ८

मिथुन:- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ३

कर्क:- व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. आर्थिक लाभ संभवतो. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ५

सिंह:- दिवस मनाजोगा व्यतीत कराल. कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. शुभ रंग लाल, शुभ अंक ७

Today Horoscope l कन्या:- मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे. शुभ रंग निळा, शुभ अंक ५

तूळ:- दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. शुभ रंग पिवळा, शुभ अंक २

वृश्चिक:- क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल. योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील. शुभ रंग हिरवा. शुभ अंक १

धनू:- कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. दुचाकी वाहन चालवताना सतर्क रहा. मनातील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा. शुभ रंग काळा, शुभ अंक ९

मकर:- अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका. भावंडांशी खटके उडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणातील गोडी वाढेल. आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल. केलेल्या कामाचा मोबदला मिळेल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ५

कुंभ:- नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलतांना संयम बाळगा. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ९

Today Horoscope l मीन:- नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सहकार्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता. कलेचा मनमुराद आनंद लुटता येईल. छंद जोपासायला वेळ काढा. शुभ रंग काळा, शुभ अंक ४

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या –

संकष्टी चर्तुर्थीच्या शुभ दिनी ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला

अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक