आर्थिक प्रगतीसाठी ‘या’ 3 गोष्टींचा अवलंब करा; मिळेल भरपूर यश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले गेले आहेत. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.चाणक्य यांचे खरे नाव विष्णुगुप्त होते. त्यांना कौटिल्य असेही म्हणतात.

आचार्य चाणक्य मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि मंत्री होते, ज्यांनी चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अर्थशास्त्र, चाणक्य नीति, नीतिशास्त्र आणि मुद्राराक्षस या त्यांच्या प्रसिद्ध रचना आहेत.

चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.त्यांची नीती आणि धोरणांचा अवलंब केला तर, तुम्ही एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता. तुम्हाला आर्थिक प्रगती हवी असल्यास चाणक्य म्हणतात की जीवनात 3 गोष्टींचा अवलंब करायला हवा.

‘या’ 3 गोष्टींचा अवलंब करा

आपली कमाई कुणाला न सांगणे : चाणक्य म्हणतात की, तुम्ही किती पैसे कमवता याबाबत कुणालाच काही सांगू नका. जरी ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल तरी या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा.कारण, कोण कधी आणि कसा त्याचा फायदा घेईल हे सांगता येत नाही.

मोहापासून अंतर ठेवा : आर्थिक प्रगतीसाठी कशाचीही ओढ धरू नका. चाणक्य (Chanakya Niti ) यांनी आपल्या धोरणात लिहिले आहे की, आसक्ती एखाद्या व्यक्तीच्या यशात अडथळा बनू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संलग्न होऊ लागते, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या संबंधात आपल्या ध्येयांकडे लक्ष देत नाही. तो इतर गोष्टींकडे अधिक लक्ष द्यायला लागतो. व्यक्ती एकदा जर मोहात अडकला तर, तो आपल्या ध्येयापासून भरकटत चालतो.त्यामुळे मोहाला बळी पडू नका. मोह आणि गरजा या मर्यादित ठेवा.

कष्टाचा पैसा : कष्टाचा आणि ईमानदारीचा पैसा कधीही चांगला असतो. अनैतिक काम करून भरपूर पैसा मिळवला तरी तो टिकत नाही. असे पैसे नंतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या हातून निसटतातच. त्यामुळे आपल्या मेहनतीने पैसा कमवा.

News Title- Chanakya Niti for Financial Prosperity

महत्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महायुतीला उमेदवार मिळेना, वैतागलेले कार्यकर्ते बारामतीत प्रचाराला दाखल

“हे तेच लोक आहेत, ज्यांना वाटतं कमळाचं बटण दाबलं की…”, किरण मानेंचा थेट प्रहार

लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव नरमले, अनंत गीतेंसाठी धोक्याची घंटा!

‘आमच्या पप्पांनी गंम्पती आणला’ फेम चिमुकला आता ‘या’ मालिकेत दिसणार

भाजपचा आधीचा खासदार निष्क्रीय, त्यात आता उपरा आणून ठेवलाय- प्रणिती शिंदे