अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद चिघळला, मोदींची कंपनीतून हकालपट्टी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raymond Group | रेमंड समुहाचे (Raymond Group) मालक आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद आता वेगळ्या वळणावर गेला आहे. दोघांमधील वाद संपताना दिसत नाही. रेमंड कंपन्यांच्या काही कंपन्यांनी सिंघानिया-मोदी यांची कंपनीतून हकालपट्टी केलीये. 31 मार्चला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने गुरुवारी सांगितले आहे. (Raymond Group)

रेमंड ग्रुपच्या (Raymond Group) तीन कंपन्यांनी, जेके इन्व्हेस्टर्स, रेमंड कंझ्युमर केअर आणि स्मार्ट ॲडव्हायझरी आणि फिनसर्व्ह यांनी नवाज मोदी-सिंघानिया यांची त्यांच्या बोर्डातून हकालपट्टी केली आहे. या कंपन्यांमधून नावाज मोदी यांची हकालपट्टी झाली असली तरीही समूहाची सूचीबद्ध कंपनी रेमंड नवाजने मोदी-सिंघानियांना आपल्या मंडळातून काढले नाही.

घरघुती हिंसाचाराचा आरोप

गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. तेव्हापासून त्यांच्यात वाद होता. 2015 रोजी जेके इन्व्हेस्टर्सचे संचालक म्हणून नवाज मोदी यांना संधी दिली. तर 2020 मध्ये रेमंड कंझ्युमर केअर तर 2017 मध्ये स्मार्ट ॲडव्हायझरी आणि फिनसर्व्ह बोर्डावर नियुक्ती करण्यात आली. नवाज मोदी सिंघानिया मुंबईच्या रेमंडच्या कार्यालयात जाण्याआधी म्हणाल्या, जेव्हा मी सिंघानियाचे कारणामे बाहेर काढायला सुरूवात केली. तसे माझ्यावर अत्याचार होऊ लागलेत. मला मारहाण केली आणि आता माझी हकालपट्टी केली.

जेके इन्व्हेस्टर्स आणि स्मार्ट ॲडव्हायझरीच्या प्रवक्त्यानं सांगितलं, नवाज मोदी आणि सिंघानिया यांचा संचालक म्हणून विश्वास गमावल्याचं पत्र कंपन्यानी दिले. भागेधारकांची बैठक बोलावून कंपनीतून त्यांची हकालपट्टी करण्यासाठी मागणी केली. 31 मार्चनंतर संचालकांची बैठक घेण्यात आली. मोदी-सिंघानिया यांना कंपनीच्या संचालक मंडळावरून हटवण्यात आलं.

75 टक्के मालमत्तेचा हिस्सा हवा

गौतम सिंघानियांच्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर आता नवाज मोदी यांना देखील विभक्त होण्याची अट ठेवली होती. त्यांनी कंपनीचा 75 टक्के हिस्सा मागितला. म्हणजेच 11 हजार कोटी रूपये मागितले. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

News Title – Raymond Group Business Companies Nawaz Modi Singhania From Board Amid Divorce Dispute

महत्त्वाच्या बातम्या

“विखे परिवार पुरता हादरला आहे त्यामुळे…”, जिल्हाध्यक्षांच्या आरोपांनी नगरच्या राजकारणात खळबळ

“सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, पराभूत होण्यापेक्षा अर्ज माघारी घ्या”

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला सर्वांत मोठा धक्का!

मतदान केल्यानंतर शिव ठाकरेची पोस्ट व्हायरल, म्हणाला…

महाराष्ट्रात आणखी एका बँकेत घोटाळा, भाजप पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ