Omraje Nimbalkar | उद्योग मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांआधी ढोकी येथे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी ठाकरे गटाचे धाराशिवचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जळजळीत टीका केली. त्याचा ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी चांगला समाचार घेतला असून तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिलंय. (Omraje Nimbalkar)
शिवसेनेच्या मेळाव्याला तानाजी सावंत बोलत असताना त्यांनी ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर हल्ला केला. सर्व सहकारी संस्थानाची याच्या बापाने आणि याने वाट लावली. तेरणा बंद पाडला आणि भंगार विकलं. खापर राणा दादांच्या नावावर फोडलं. तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान केलं. या सावंत सरांनी तुझ्या गोडाऊनला शेतकऱ्यांची 60 लाख क्विंटल साखर विकली, असा एकेरी उल्लेख करत तानाजी सावंत यांनी ओमराजेंवर निशाणा साधला.
“तु किस झाड की पत्ती”
तानाजी सावंत यांनी केलेल्या हल्लावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर देत टीकेची तोफ डागली आहे. “मी गेली 40 वर्षे मंत्री असलेल्या पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांना गार केलंय, तु किस झाड की पत्ती है”, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता हल्ला केला. यावर तानाजी सावंत काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं गरजेचं आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान
राज्याचं राजकारण हे वेगळ्या पातळीवर गेलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालंय. तर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून ओमराजे निंबाळकर पुन्हा उमेदवार असतील. तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना संधी देण्यात आली. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संधी देण्यात आली. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे मतदान हे तिसऱ्या टप्प्यात आहे. म्हणजेच 7 मे रोजी हे मतदान होणार आहे.
News Title – Omraje Nimbalkar On Tanaji Sawant At Dharashiv Loksabha
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून लढणार
अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद चिघळला, मोदींची कंपनीतून हकालपट्टी!
‘देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार?’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
“विखे परिवार पुरता हादरला आहे त्यामुळे…”, जिल्हाध्यक्षांच्या आरोपांनी नगरच्या राजकारणात खळबळ
“सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, पराभूत होण्यापेक्षा अर्ज माघारी घ्या”