मध्यरात्री घडलं असं काही की निवडणूक भरारी पथकाची ही झोप उडाली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Crime News l देशात लोकसभा निवडणणुकीचे वारे फिरत आहेत. त्यामुळे देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता सुरु असताना देशात अनेक कठोर निर्बंध लागू असतात. अशातच त्यातील एक निर्बंध म्हणजे आचारसंहिता काळात रोकड रक्कम नेता येत नाही. जर याकाळात रोकड, धातू नेले जात असतील तर भरारी पथकाकडून कठोर कारवाई केली जाते.

भांडूपमध्ये मोठी कारवाई :

अशातच राज्यात भरारी पथकाने गेल्या 44 दिवसांत 40 कोटींची रक्कम पकडली आहे. त्यामध्ये 69.38 कोटींचे मौल्यवान धातू देखील जप्त केले आहेत. तसेच 35 लाख लिटर दारु, 79.87 कोटींच्या अन्य वस्तू असा एकूण 431.34 कोटींचा मुद्देमाल भरारी पथकाकडून जप्त केला आहे.

अशातच काल म्हणजेच शनिवारी 27 एप्रिल रोजी मध्यरात्री भांडूपमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर कॅशने भरलेल वाहन नाकाबंदी दरम्यान पकडण्यात आलं आहे. त्यावेळी भरारी पथकाकडून त्यामध्ये तब्बल तीन ते साडे तीन कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात आता सखोल चौकशी सुरु झाली आहे.

Mumbai Crime News l गाडीतील ही रक्कम कुठे जात होती? :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. यावेळी निवडणूक भरारी पथकाने एक वाहन पकडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वाहनात तब्बल तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम असल्याचे समोर आले आहे. निवडणूक भरारी पथकाने पकडलेली ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक देखील दाखल झाले आहेत पथकाने पकडलेल्या कॅशची मोजणी सुरू करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करण्याऱ्या गाडीसारखी असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु गाडीतील ही रक्कम कुठे जात होती, ती रक्कम नेमकी कोणाची आहे, यासंदर्भात गाडी चालकाने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे हा प्रकार नेमका काय आहे याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

News Title : Bhandup in the middle of the night, the team seized crores of cash

महत्त्वाच्या बातम्या

या दोन राशींसाठी पुढील काही तास महत्वाचे; मिळणार पैसाच पैसा

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा

“मी पद्मसिंह पाटील आणि राणांना गार करून आलोय, तानाजी सावंत तू किस झाड की पत्ती है”

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; स्थानिकांच्या दाव्याने खळबळ