भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vivo X Fold 3 Pro l आजकाल तरुणांमध्ये मोबाईलची क्रेझ आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच विवो कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी लवकरच बाजारात Vivo X Fold 3 Pro हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Vivo X Fold 3 Pro लवकरच भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार :

Vivo X Fold 3 Pro लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. हा फोन BIS सर्टिफिकेशनवर दिसला आहे. तिथून त्याच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. हा फोन व्हॅनिला ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. कंपनी या स्मोर्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स देणार आहे.

कंपनीने या संर्टफोनची अद्याप किंमत जाहीर केली नाही. अगदी पुढील काही हप्त्यांमध्ये हा स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5,700 mAh बॅटरी दिली आहे.

Vivo X Fold 3 Pro स्पेसिफिकेशन :

डिस्प्ले : या फोनमध्ये 8.03 इंच आतील फोल्डिंग डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2480×2200 पिक्सेल आहे. तसेच यामध्ये 6.53 इंचाची बाह्य स्क्रीन देखील आहे. दोन्ही स्क्रीन AMOLED LTPO तंत्रज्ञानासह येतात आणि त्याचा रिफ्रेश दर 120hz आहे. शिखर ब्राइटनेस 4,500 nits आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ साठी देखील सपोर्ट आहे.

प्रोसेसर: या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 चिपसेट Adreno GPU सह आहे, जो 1TB UFS4.0 स्टोरेज आणि 16 GB LPDDR5X रॅमसह जोडलेला आहे.

बॅटरी आणि OS: या स्मार्टफोनमध्ये Android 14 वर चालणारी OriginOS 4 ऑपरेटिंग सिस्टम आहे. 100W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,700 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे 50W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी : या स्मार्टफोनमध्ये ड्युअल 5G सपोर्ट, ब्लूटूथ v5.3, Wi-Fi 7, IR ब्लास्टर आणि NFC सपोर्ट आहे. फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक ड्युअल स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

News Title : Vivo X Fold 3 Pro Launched Date

महत्त्वाच्या बातम्या

मध्यरात्री घडलं असं काही की निवडणूक भरारी पथकाची ही झोप उडाली

या दोन राशींसाठी पुढील काही तास महत्वाचे; मिळणार पैसाच पैसा

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा

“मी पद्मसिंह पाटील आणि राणांना गार करून आलोय, तानाजी सावंत तू किस झाड की पत्ती है”