किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Mane | मराठी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, बिग बॉसमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचणारे किरन माने (Kiran Mane) हे लोकांना आता अधिकच परिचयाचे झाले आहेत. त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत शिवबंधन बांधलं. तेव्हापासून ते सोशल मीडियावर लिहित विरोधकांवर हल्ला करत आहेत. त्यांच्या उपरोधिक टीक अनेकदा चर्चेत असतात. अशातच आता भाजपचे नेत्याची यांच्या एक मुलाखत पूर्ण पाहिली तर मी 15 लाख रूपये देणार असल्याचं आता किरण माने (Kiran Mane)  म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रूपये देण्यात येणार असल्याचं आश्वासनं दिलं होतं. मात्र आता तोच आकडा किरण मानेंकडून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची पूर्ण मुलाखत पाहिल त्याला देण्यात येणार आहे. किरण माने (Kiran Mane) यांच्या या ऑफरने हसावं की रडावं हे कळेनासं झालंय. ही मुलाखत मराठी अभिनेता आणि अँकर संकर्षण कऱ्हाडे यांनी घेतली. (Kiran Mane)

किरण मानेंची ऑफर

राजकारणापलिकडलं बरंच काही! या शीर्षकाखाली चंद्रकांत पाटील यांची मुलाखत झाली. चंद्रकांत पाटील यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलीये. चंद्रकांत पाटील यांनी लहानपणीचे दिवस, शिक्षण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधील संघर्षाचे दिवस सांगितले आहेत. याबद्दलची आठवण मुलाखतीच्या माध्यमातून ताजी केलीये.

किरण माने फेसबुक या सोशल माध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यावर मुलाखतीबाबत किरण माने स्टाईलने टोला लगावला आहे. “थोर राजकारणी चंद्रकांत पाटील उर्फ चंपा यांची शक्य तितकं भयाण लाचार हसत संकर्षण कऱ्हाडेनं मुलाखत घेतली. जो कोणी पूर्ण पाहून दाखवेल त्याला पंधरा लाख ही माझी गॅरंटी!”,

अभाविपचा मार्ग निवडला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला आहे. सध्या सर्वत्र या मुलाखतीची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, त्यांनी अभाविपचा मार्ग निवडण्याचा किस्सा सांगितला. मी गिरणीत काम करावं असं आई-वडिलांना वाटायचं. त्यानंतर माझा अभाविपच्या कार्यकर्त्यांशी संबंध झाला. मी त्यांच्यासोबत फिरू लागलो. माझं आणि माझ्या बहिणीचं शिक्षण पूर्ण केलं. अभाविपचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. हा निर्णय घेण्याआधी माझा घरच्यांशी वाद झाला, असा किस्सा चंद्रकांत पाटील यांनी सांगितला.

नितीन गडकरींमुळे भाजपमध्ये प्रवेश

विवाह करण्यासाठी त्यांनी 1993 मध्ये अभाविपमधून बाहेर पडले. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून मी 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा पुणे पदवीधर मतदारसंघातून उभा राहून निवडणूक जिंकली. त्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला तो अद्यापही सुरू आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

News Title – Kiran Mane Give Challenge Of Watching Interview Of Chandrakant Patil

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून लढणार

अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद चिघळला, मोदींची कंपनीतून हकालपट्टी!

‘देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार?’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“विखे परिवार पुरता हादरला आहे त्यामुळे…”, जिल्हाध्यक्षांच्या आरोपांनी नगरच्या राजकारणात खळबळ

“सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, पराभूत होण्यापेक्षा अर्ज माघारी घ्या”