पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

Diesel-Petrol Prices

Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज (28 एप्रिल) रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील इंधनदर

राज्यात आज 28 एप्रिल रोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रतिलिटर आहे. तर, डिझेल 91.47 रुपये प्रति लीटर आहे. काल    महाराष्ट्रात पेट्रोलचा दर असाच होता. म्हणजेच कालपासून राज्यात पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 1 एप्रिल 2024 रोजी  पेट्रोलचे दर 104.90 रुपये प्रति लिटर होते. आता महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आज (Petrol-Diesel Price Today ) पेट्रोलची किंमत 0.11 टक्क्यांनी कमी होऊन 104.87 रुपये प्रति लीटर झाली. या महिन्यात कमाल किंमत 104.98 रुपये प्रति लीटर तर किमान किंमत 104.78 रुपये प्रति लीटर राहिली.

गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रतिलिटर राहिली. वाहनचालकांना इंधन दरात जराही दिलासा मिळाला नाही. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. या काळात सरकारकडून किंमती कमी केल्या जातील, अशा आशा होत्या. मात्र, नागरिकांची सपशेल निराशा झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील दर

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 89 डॉलरच्या वर आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $89.50 वर आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $83.85 वर व्यापार करत आहे. भारताचा विचार केला तर, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी आज सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.

नवी दिल्लीत आज पेट्रोलचे दर 94.72 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत (Petrol-Diesel Price Today ) पेट्रोलचे भाव 104.21 रुपये आहे. कोलकात्यात 103.94 प्रतिलिटर तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 100.75 रुपये प्रति लिटर आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून इंधनाच्या किमतीवर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि व्हॅट जोडल्यानंतर पेट्रोलची किरकोळ किंमत निश्चित केली जाते. ही योजना जून 2017 पासून देशभरात लागू आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर अपडेट केले जातात.

News Title- Petrol-Diesel Price Today 28 April 2024 

महत्त्वाच्या बातम्या –

ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार

मध्यरात्री घडलं असं काही की निवडणूक भरारी पथकाची ही झोप उडाली

या दोन राशींसाठी पुढील काही तास महत्वाचे; मिळणार पैसाच पैसा

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .