इशान किशनला बीसीसीआयचा धक्का; केली मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL-2024) मध्ये (27 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. हा सामना अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला असून या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा 10 धावांनी परभव झाला. ही मुंबईच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. मात्र अशातच आता आणखी एक वाईट बातमी मुंबईच्या चाहत्यांसाठी आलीये. मुंबईचा खेळाडू इशान किशनने नियमनांचं उल्लंघन केल्याने त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई केलीये.

इशान किशनवर बीसीसीआयची कारवाई

मुंबईचा यष्टीरक्षक आणि फलंदाज इशान किशनवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने कारवाई केली आहे. त्याच्यावर सामन्याच्या शुल्कातील 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. (IPL 2024)

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबईच्या सामन्यानंतर त्याच्यावर आयपीएलच्या (IPL 2024) नियमांचे उल्लंघन केल्याने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक दाखल केली आहे. त्याने ती चूक मान्य केली. लेव्हल 1 च्या चुकीसाठी सामनाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो. (IPL 2024)

आयपीएलच्या (IPL 2024) आचारसंहितेतील कलम 2.2 च्या उल्लंघनाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.2 मध्ये स्टंपला पाय मारणे, जाहीरातीचे बोर्ड पाडणे, ड्रेसिंगरूमची तोडफोड, आरसे, खिडक्यांचे नुकसान करणे याचा समावेश होतो. तसेच क्रिकेटचे साहित्य, उपकरणे आणि कपडे, मैदानी उपकरणांचा गैरवापर यांचा देखील समावेश होतो.

दरम्यान, याआधी डीआरएस प्रकरणी मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू टीम डेव्हिड आणि संघाचा प्रशिक्षक कायरन पोलार्डला दंड ठोठावण्यात आला होता. तर त्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला देखील स्लो ओव्हर रेटने गोलंदाजी केल्याने दंड ठोठावण्यात आला होता.

इशानची लज्जास्पद कामगिरी

इशान किशनची दिल्ली विरूद्धच्या सामन्यात लज्जास्पद कामगिरी पाहायला मिळाली. त्यावेळी इशान केवळ 20 धावा करत बाद झाला. तसेच रोहित शर्माने देखील केवळ अहमद खलीलच्या गोलंदाजीवर 8 धावा करत डगआऊटचा आश्रय घेतला. दिल्लीने 257 धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र मुंबईला 247 धावा करता आल्या. अवघ्या 10 धावांनी मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झाला.

News Title – IPL 2024 Ishan Kisan10 Percent Fine of His Match Fees For Breaching Conduct During DC vs MI

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीला निवडणूक सोपी नाही, कारण राज्यात… छगन भुजबळांनी सांगितला नेमका मुद्दा

‘या’ तीन चुका कधीच करू नका; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर