“भाजपचे उमेदवार धडाधड पाडा, कांद्याकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raju Shetty | लोकसभा निवडणूक जशी जवळ येते तसे सरकार जनतेच्या हितासाठी वाटेल ते करतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार अनेक योजना आणण्याचं काम करताना दिसत आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी बांधव हे कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी सरकारकडे मागणी करताना दिसत आहे. जशी लोकसभा निवडणूक जवळ आली तशी सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवलीये. सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता राजू शेट्टी यांनी यांनी धडाधड उमेदवार पाडा. हेच काय कोणतंच सरकार कांद्याकडे पाहणार नाही, अशी टीका राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सरकारवर केली.

“लोकसभा निवडणूक जवळ आल्या की…”

निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका. शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातीवरील बंदी हटवण्यासाठी आंदोलन करत होते. अनेकदा सरकारकडे निवेदने जात होती. शेतकरी रस्त्यावर उतरत होते. मात्र तेव्हा सरकार ऐकायला तयार नव्हते. जशा लोकसभा निवडणुका जवळ आल्या की भाजप आणि मित्र पक्षांना उमेदवार पडणार अशी लक्षणे दिसून येणार, अशी टीका राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली.

आधी गुजरातला कांदा निर्यातीचे आदेश दिले. त्यावर टीका करण्यात आल्यानंतर आता 99 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिलीये. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण फार उशीरा हा निर्णय घेतला. निर्यातीला परवानगी द्यायची आहे तर अटी कशाला घालता?, असा सवाल राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला.

जेवढा कांदा निर्यात व्हायचा आहे तेवढा होऊदे. कांदा निर्यातीवरील बंधने काढून टाकावी, अशी मागणी आता राजू शेट्टी यांनी केलीये. शेतकऱ्यांचे डोळे वटारल्यानंतर सरकार घाबरत असेल तर त्यांचे उमेदवार पाडा, असं राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणालेत.

“कोणतेच सरकार कांद्याकडे पाहण्याची हिंमत करणार नाही”

यावेळी बोलत असताना त्यांनी हेच काय कोणतेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेनं पाहत असेल तरीही त्यांचे उमेदवार धडाधड पाडा. तेव्हा हेच काय कोणतंही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करणार नाही, असं राजू शेट्टी म्हणालेत.

News Title – Raju Shetty To Farmers On Onion Import Ban Maharashtra Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा

“मी पद्मसिंह पाटील आणि राणांना गार करून आलोय, तानाजी सावंत तू किस झाड की पत्ती है”

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; स्थानिकांच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून लढणार