शरद पवारांचा महायुतीला गंभीर इशारा, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | सातारा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. तर त्यांच्याविरोधात माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीये. दोन्ही उमेदवार हे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचे मानले जतात. अशातच आता सातारा लोकसभा निवडणुकीची तारीख तोंडावर आहे. अशातच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत शशिकांत शिंदे यांच्याविरोधात रान पेटवण्याचं काम केलंय. (Sharad Pawar)

अशातच आता शशिकांत शिंदे यांना मुंबई पोलीस नोटीस बजावणार असल्याची चर्चा आहेत. मुंबई बाजारसमिती प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तर उदयनराजे भोसले यांनी देखील भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्लाबोल केला आहे. याचपार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुतीला इशारा दिला आहे. जर शशिकांत शिंदे यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून  महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही. (Sharad Pawar)

“शशिकांत शिंदेंना अटक केली तर…”

“दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलं काम करत होते. मोदी सरकारच्या विरोधात बोलत होते. त्यांना तुरूंगात पाठवलं. राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत होते त्यांना तुरूंगात पाठवलं. त्यानंतर संजय राऊत यांना तुरूंगात पाठवलं. आता बाजार समितीचं काम शशिकांत शिंदे करत आहेत तर त्यांना अडवलं जातंय. निवडणुकीतून थांबवण्यासाठी हे केलं जातंय. जर शशिकांत शिंदे यांना अटक केली तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

“10 वर्षात मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही”

“मी मतदारसंघातून उभा राहिलो तेव्हा मला अशीच साथ दिली होती हे मी विसरणार नाही. आताही तशीच साथ द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीकडे इतर देशाचंही लक्ष लागलं आहे. इतर देशातील लोकांनी आपल्या देशातील लोकशाही पाहिली आहे. आता स्थिती वेगळी आहे. पंतप्रधानांच्या संवादावर विश्वास नाही. मोदींनी 10 वर्षांपासून एकदाही पत्रकार परिषद घेत आपली भूमिक मांडली नाही. यांच्या हातात सत्ता द्यायची का? याचा निर्णय घेण्याची वेळ आलीये,” असं शरद पवार म्हणालेत.

“या देशामध्ये गेल्या 10 वर्षांपासून नरेंद्र मोदी हे सत्तेत आहेत. ते मुख्यमंत्री होते, आरएसएसचे काम करत होते. त्यांना मंत्रीमंडळात जाऊन देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पाच वर्षे झाली, दहा वर्षे झाली आणि तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी त्यांना मतदान द्या, असं त्यांचे सहकारी ठिकठिकाणी जाऊन सांगत आहेत. त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे,” असं शरद पवार म्हणालेत.

News Title – Sharad Pawar Aggressive On Mahayuti About Shashikant Shinde Arrest

 महत्त्वाच्या बातम्या

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा

“मी पद्मसिंह पाटील आणि राणांना गार करून आलोय, तानाजी सावंत तू किस झाड की पत्ती है”

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; स्थानिकांच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून लढणार