वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण; अनेक लोक होतायेत बेशुद्ध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Heat Wave l सध्या देशासह राज्यात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अशातच आता उन्हाचा वाढता पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहेत.

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात :

वाढत्या तापमानामुळे उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे. या वाढत्या तापमानात अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही उद्धवतात. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक बेशुद्ध पडल्याचे दिसत आहेत. मात्र उष्णतेची लाट टाळण्यासाठी उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे.

याशिवाय उन्हाळ्यात उन्हात जास्त फिरल्याने लोक बेशुद्ध देखील होत आहेत. या कडाक्याच्या उन्हात चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे, भोवळ येण्यासारख्या समस्या जास्त प्रमाणात आढळत आहेत. तसेच उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे पाहुयात.

Heat Wave l उष्णतेची लाट टाळण्यासाठी काय करावे :

– उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचं आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारख्या समस्या जास्त जाणवतात.
– तसेच उन्हाळ्यात तुमच्या आहारात पाणी, नारळपाणी, पाणीयुक्त पदार्थ आणि ज्यूस यांचा समावेश नक्की करावा.
– सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात चहा-कॉफी कमी प्या. यामुळे तुम्ही डिहायड्रेट देखील होऊ शकता.
– घराबाहेर पडताना बाहेर काळजी घ्या.
– तसेच शक्यतो दुपारी 12-3 च्या दरम्यान शक्य तितक्या कमी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
– तसेच कमी रक्तदाबापासून बचाव करण्यासाठी लिंबू सरबत प्या.
– उन्हाळ्यात प्रथिने युक्त नाश्ता करा.
– स्ट्रॉबेरी, संत्री, काकडी आणि टरबूज यांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश करावा.
– उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

News Title – People are fainting in summer

 महत्त्वाच्या बातम्या :

निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!, कांद्यावरील बंदी कायम, ती आकडेवारी जुनी

शरद पवारांचा महायुतीला गंभीर इशारा, म्हणाले…

“भाजपचे उमेदवार धडाधड पाडा, कांद्याकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही”

इशान किशनला बीसीसीआयचा धक्का; केली मोठी कारवाई

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 3 योजना ठरतायेत फायदेशीर!