Baramati Loksabha | राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्यामध्ये बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात दोन्ही गटातून प्रचार सुरूये. पवार विरूद्ध पवार अशी लढत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे मतदारसंघातील गावांमध्ये जात सभा घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार देखील यांनी प्रचाराला जोर लावला. अशातच आता अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीतील (Baramati Loksabha) गावांमध्ये धमकी देत असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. (Baramati Loksabha)
गेल्या काही दिवसांआधी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी बारामतीतील जळगाव सुपे येथे सभेला संबोधित करत असताना निवडणुकीच्या एक ते दोन दिवस आधी दडपशाही केली जाईल. पैसे वाटले जातील असा आरोप केला होता. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दंडात्मक कारवाईची भाषा करताना दिसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Baramati Loksabha)
धमक्यांचे सत्र सुरू
राज्यातील अनेक मतदारसंघात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे धमक्या देताना दिसत आहेत. सोलापूरात तर उत्तम जानकर यांच्या नावाने धमकी देण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये स्वत: अजित पवार हे धमक्या देत सुटले आहेत. व्यापारी व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाईची धमकी देण्यात येत आहे. धमक्या देण्याची भाषा करत असाल तर राज्यातील जनतेनं ठरवलं आहे काय करायचं ते, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
आपल्याला ही भाषा शोभते का?
“बारामती येथील गावात अजित पवार हे धमक्या देत आहेत. मला मताधिक्य नाही दिले तर बघून घेईल. आपण अनेक वर्षांपासून विधानसभेमध्ये आहात आपल्याला ही भाषा शोभते का? निवडूण यायचे असेल तर लोकांना निर्णय घेऊद्या. तुम्ही खरे की शरद पवार खरे,” असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
“दिल्ली गुजरातमधील जर कोणी शरद पवार यांचा बारामतीमध्ये पराभव करण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठी माणूस म्हणून आम्ही एकत्र येऊ. शरद पवार यांचा बारामतीत पराभव करून तो पराभव देशाला दाखवणं ते शक्य नाही. सुप्रिया सुळेंबरोबर आम्ही सर्व भावंडं आहोत,” असं संजय राऊत म्हणालेत.
News Title – Baramati Loksabha Village In Ajit Dada Threats Sanjay Raut Statement
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी ‘या’ 3 योजना ठरतायेत फायदेशीर!
महायुतीला निवडणूक सोपी नाही, कारण राज्यात… छगन भुजबळांनी सांगितला नेमका मुद्दा
‘या’ तीन चुका कधीच करू नका; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप
काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा
पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!