इथे मिळतंय मोफत पेट्रोल! मतदान करा अन् ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मोफत मिळवा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाचा दूसरा टप्पा नुकताच पार पडला.या दोन्ही टप्प्यात विदर्भात मतदारांनी उत्साह दाखवला नाही. यावेळी 2019 पेक्षा कमी मतदान झालं आहे. आता मतदानाचा टक्का वाढावा म्हणून पुणेकरांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

पुणेकरांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडल्यास त्यांना 50 रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेअंतर्गत मतदान करुन एक लिटर ऑईल खरेदी करणाऱ्यास 50 रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे.

काय आहे योजना

पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशकडून ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान करुन आल्यानंतर बोटावरील शाई दाखवली आणि एक लिटर ऑईल खरेदी केले तर 50 रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाणार आहे. अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली आहे.

पुण्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 20 मेपर्यंत (Pune News ) ही मोहीम सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त पेट्रोल डिलर्स असोसिएशन घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत करणार आहे.याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांना 20 हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

मतदानाचे टप्पे

तिसरा टप्पा : तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

चौथा टप्पा : 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडणार असून,यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे.

पाचवा टप्पा : 20 मे 2024 रोजी पाचवा टप्पा पार पडणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे.

News Title : Pune News Voters will Get Rs 50 Worth Of Petrol Free After Voting 

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 3 योजना ठरतायेत फायदेशीर!

महायुतीला निवडणूक सोपी नाही, कारण राज्यात… छगन भुजबळांनी सांगितला नेमका मुद्दा

‘या’ तीन चुका कधीच करू नका; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!