‘आधी अजितदादांनी हे सांगावं’; रोहित पवारांचं थेट अजित पवारांना चॅलेंज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा निवडणुकीकडे (Baramati Lok Sabha) अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिली जात आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक जिंकण्यासाठी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहे.

भोरमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल केली आहे. मी केलेली कामं खासदार त्यांचे फोटो लावून त्यांची सांगत असल्याचा आरोप करत अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मिमिक्री केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेनंतर आता आमदार रोहित पवार यांनी थेट अजितदादांना आव्हान दिलं आहे. अजित पवार यांनी बारामतीत कुठली कंपनी आणली ते सांगावं?, असं आव्हानच रोहित पवार यांनी दिलं आहे.

बारामती एमआयडीसी मधील कंपनी कोणी आणल्या? त्या पण दादांनी सांगावं. माविआ सरकार आल्यावर नेत्यांना पद मिळाली. नेत्यांनी विकास केला. माविआ सरकारमध्ये असताना निधी घेऊन गेले. साहेबांच पण काम आहे. सगळ आपण केलं असं कसं म्हणतात दादा?, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला.

अजितदादा स्वतः बारामती विधानसभा आमदार आहेत, तिकडे अजितदादांनी कुठली कंपनी आणली हे सांगावं मग बाकी तालुक्यातील बोलावं?, असं आव्हान रोहित पवार यांनी दिलंय.

काय म्हणाले अजित पवार?

सुप्रिया सुळे यांच्या प्रचार पुस्तकांत मी केलेली कामं छापण्यात आली आहेत. खासदाराने माझी सगळे कामं त्यांनी केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. बारामतीतील सगळ्या इमारती मी बांधल्या आहेत. मात्र फोटो त्यांच्या पुस्तकात दिसत आहे. सुप्रिया सुळे मी केलेल्या कामांचं श्रेय घेत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

इथे मिळतंय मोफत पेट्रोल! मतदान करा अन् ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मोफत मिळवा

संजय राऊतांचा अजित पवारांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण; अनेक लोक होतायेत बेशुद्ध

निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!, कांद्यावरील बंदी कायम, ती आकडेवारी जुनी

शरद पवारांचा महायुतीला गंभीर इशारा, म्हणाले…