“…त्या एका वक्तव्याने माझं वाटोळं झालं”, भरसभेत अजित पवारांनी धरले कान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. यासाठी आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला नंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात फूट पाडली.

बारामती बालेकिल्ला जिंकण्यासाठी शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार (Ajit Pawar) यांचा वापर केला गेला असल्याच्या चर्चा आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. एकाबाजूला सुनेत्रा पवार आणि दुसऱ्या बाजूनं बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. याचपार्श्वभूमीर अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये शिर्सुफळ येथे सभा घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी त्यांनी केलेल्या एक वक्तव्याची आठवण सांगून आपलेच कान धरले आहेत.

धरणाच्या वक्तव्यावर अजित पवारांनी धरले कान

अजित पवार म्हणाले की, काही केलं तरीही झाकून राहत नाही. मी निंबोरीत बोललो होतो. घोंगडी सभा होती. तिथं आपल्या भाषेत बोलायला गेलो आता तिथं काय करावं का धरणात?, तेव्हा पासून कानाला खडा. सारखं सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं. शब्द कुठलाही चुकीचा जाऊ द्यायचा नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.

कार्यकर्ते माझ्या सभेला आलेत. मी दिसलो की पुढे पुढे करतील. मी गेलो की दुसरीकडे जातील. कुंकु लावायचं असेल तर एकाचं लावा. माझं तरी लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे लपून राहत नाही, असं अजित पवार म्हणालेत.

“आताच्या निवडणुकीत साहेब नाहीत आणि मी पण नाही”

आताच्या निवडणुकीत साहेब नाहीत आणि मी पण नाही. 40 वर्षांआधीपासून आलेल्या सुनेला निवडून द्यायचं की मुलीला निवडून द्यायचं ते बघा. सुनेला मान असतो, सासू थोड्या दिवसांनी तिच्याच हतात चाव्या देतात. काही चुकलं तर सुनेला सांगते. आईच्या पोटातून कोणीही शिकून येत नाही. आज भावनिक होऊ नका, असं आवाहन अजित पवार यांनी उपस्थितांना केलं.

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार हे गावोगावी जात प्रचार करताना दिसत आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात प्रचार होताना दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.

News Title – Ajit Pawar On His Old Controversial Statement

महत्त्वाच्या बातम्या

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव

“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची”

तरुणांसाठी खुशखबर! स्टार्टअपसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं लोन

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं आयुष्य!

कशाला करतो गॅरंटीची बात!, रॅपच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल