“येणार तर अण्णाच”, अभिनेता प्रविण तरडेंनी सांगून टाकला पुणे लोकसभेचा निकाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha) हा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मतदारसंघ मानला जातो. अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीये. यामुळे पुण्याचा निकाल काय लागेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अशात अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडेंनी पुणे लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे.

प्रवीण तरडेंनी सांगितला निकाल-

प्रविण तरडेंनी पुणे लोकसभा निवडणुकीचा निकालच सांगून टाकला आहे. तरडेंनी केलेली एक कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रविण तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्या पोस्ट खाली एक कमेंट केली आहे. ‘येणार तर अण्णाच’, असं प्रविण तरडेंनी म्हटलं आहे. यामुळे प्रविण तरडेंनी मुरलीधर मोहोळ हेच पुण्यातून विजयी होणार असल्याचं भाकीत व्यक्त केलंय.

पुण्यात मुरलीधर मोहोळांचं पारडं जड-

पुणे लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे, मात्र असं असलं तरी सध्याच्या घडीला पुण्यात मोहोळ यांचं पारडं जड असल्याचं मानलं जातंय. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याने भाजपच्या गिरीश बापट यांना संधी दिली होती, त्याआधी भाजपचेचे अनिल शिरोळे पुण्याचे खासदार होतो, त्यामुळे पुणे हा भाजपचा गड मानला जातो. पुण्यातील भाजप आमदारांची संख्या लक्षात घेतली तरी पुण्यात भाजपचा किती प्रभाव आहे याचा अंदाज येतो.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, मात्र त्यामागील कारणं शोधून भाजपने ती चूक यावेळी होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. सध्या मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात सुद्धा आघाडी घेतल्याचं चित्र आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुद्धा पार पडणार आहे, त्यामुळे येणार तर अण्णाच असा विश्वास प्रवीण तरडे यांना आहे आणि त्यांनी तो सोशल मीडियावर बोलून दाखवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…त्या एका वक्तव्याने माझं वाटोळं झालं”, भरसभेत अजित पवारांनी धरले कान

माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ, शेकडो महिलांवर…

‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव

“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची”