मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार, केली सर्वात मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | बीडच्या सिरसमार्ग येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली होती. ते नकतंच रूग्णालयातून थेट बीड येथील एका अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने दाखल झाले होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं कार्यक्रमात बोलत असताना सांगितलं.

“…तर मी स्वत: निवडणूक लढणार”

जर मराठा समाजाला सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करून दिली नाहीतर मराठा समाज यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उभा राहणार आहे. “मराठा समाज 288 विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीसाठी मी स्वत: देखील उभा राहिल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. “आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. लोकसभेत आम्ही जे सगेसोयऱेला विरोध करत आहेत त्या पक्षाचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठा समाज शांत राहणार नाही,” असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जरी उमेदवार उभा केला नसला तरीही आम्ही येत्या विधानसभेला उमेदवार उभे करणार आहोत. गेल्या एक महिन्यांपासून विधनसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मराठा समाजाच्या एकीची धास्ती सरकारने घेतली असून पाच टप्प्यात निवडणूक घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:चा प्रचार करून इतर नेत्यांचा प्रचार करत आहे”, असं म्हणत मनोज जरांगेंनी मोदींना देखील सोडलं नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या एका सहकार्याने बीडमधून लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. त्यांचं नाव हे गंगाधर काळकुटे होतं. यावर बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले की, त्यांच्या मागे कोणी आहे का? ते मला भेटून बीडमध्ये गेले आणि अर्ज भरला?, असं मनोज जरांगे म्हणाले.

जरांगेंची महायुतीवर जळजळीत टीका

माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वत:चा प्रचार सोडून इतरांचा प्रचार करावा लागत आहे. मोदींना इकडं लक्ष देण्याची काहीही गरज नव्हती. मात्र मराठा समाज एकवटल्याने मोदींना प्रत्येक टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात बोलवावं लागत आहे,” असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

News Title – Manoj Jarange Will Contest Election At Maharashtra Vidhansabha Election

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी मुळशीचं पाणी आणणार!, मुरलीधर मोहोळ यांचा पुणेकरांना शब्द

“येणार तर अण्णाच”, अभिनेता प्रविण तरडेंनी सांगून टाकला पुणे लोकसभेचा निकाल

“…त्या एका वक्तव्याने माझं वाटोळं झालं”, भरसभेत अजित पवारांनी धरले कान

माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ, शेकडो महिलांवर…

‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम