“…तर मी टक्कल करून फिरेल”, मनसे नेते अविनाश जाधवांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ratnagiri Sindhudurg Loksabha | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri Sindhudurg Loksabha) हा कोकणातील प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीस्ट निर्माण होत होते. याआधी नारायण राणे यांना उमेदवारी देण्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांचा विरोध होता. किरण सामंत यांना उमेदवारी देण्यासाठी उदय सामंत यांनी कंबर कसली होती. मात्र अंतिम क्षणात नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. आता मनसे पक्ष नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सरसावला आहे. (Ratnagiri Sindhudurg Loksabha)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता नारायण राणे यांच्या बाजूने प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज ठाकरे यांचे नेते आणि कार्यकर्ते हे महायुतीच्या बाजूने प्रचार करताना दिसत आहेत. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये (Ratnagiri Sindhudurg Loksabha) मनसेनं सभेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी जर विनायक राऊत यांनी अडीच लाखांचं लीड घेतलं तर मी टक्कल करून फिरेल, असं  चॅलेंज विनायक राऊत यांना दिलंय. (Ratnagiri Sindhudurg Loksabha)

उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या प्राचारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेचं आयोजन केलं. दुसरीकडे नारायण राणे यांच्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचारास जोर लावला. सभेमध्ये मनसे नेते बाळा नांदगावर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. मनसेची प्रचार सभा असून अविनाश जाधव यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

“शिवसेनेचे जे काही नाचे आहेत…”

“नारायण राणे यांना बहुमताने निवडून आणायचं हा विचार आमच्या मनामध्ये तर आहेच, मात्र शिवसेनेचे जे काही नाचे आहेत जे राज ठाकरे साहेबांवर भुंकतात ना त्यांना पाडण्यासाठी आम्ही इथे आलोय.” असं अविनाश जाधव म्हणालेत. त्यानंतर विनायक राऊत यांनी आपण अडीच लाख मतांनी विजयी होणार, असा दावा केला होता. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर अविनाश जाधव यांनी राऊतांवर टीका केलीये.

“तर मी टक्कल करून फिरेल”

“रात्री साडे सहानंतर भिंत चाचपडत जाणारा माणूस अडीच लाख मतांनी निवडून कसा येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर निवडून येणारी ही लोक. विनायक राऊत जिथं राहतात तिथं त्यांना कोणीही विचारत नाहीत. ते कुठे अडीच लाख मतांनी निवडून येणार. विनायक राऊत जर अडीच लाख मतांनी निवडून आले तर टक्कल करून फिरेल”, असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय.

News Title – Ratnagiri Sindhudurg Loksabha MNS Leader Avinash Jadhav Challenge To Vinayak Raut

महत्त्वाच्या बातम्या

“येणार तर अण्णाच”, अभिनेता प्रविण तरडेंनी सांगून टाकला पुणे लोकसभेचा निकाल

“…त्या एका वक्तव्याने माझं वाटोळं झालं”, भरसभेत अजित पवारांनी धरले कान

माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ, शेकडो महिलांवर…

‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव